शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

लग्न जोडून देण्याच्या नावाखाली फसवणूक, बंटी-बबली व वधूविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 20:06 IST

फसवणूक करणाऱ्या बंटी-बबली व उपवधू अशा तिघांविरुद्ध फैजपूर पोलिसात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देपाडळसा येथील तरुणाची दीड लाखात फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क

फैजपूर : लग्न होण्यास अडचणी येणार्‍या उपवरांना हेरून त्यांना लग्न सोडून देतो, सांगत फसवणूक करणाऱ्या बंटी-बबली व उपवधू अशा तिघांविरुद्ध फैजपूर पोलिसात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पाडळसा येथील २९ वर्षीय तरुण प्रमोद भागवत तेली याची दीड लाखात फसवणूक झाली आहे.

गुन्हा दाखल झालेल्या बंटी-बबली अर्थात अशोक कडू चौधरी ( कुंभारखेडा ता रावेर),  रेश्मा रफिक खान (मीना, शाहनगर नगर औरंगाबाद) व रूपाली अशी तिघांची नावे आहे. प्रमोद याचा विवाह ३१ ऑक्टोबर रोजी पाडळसा येथे रूपाली नामक तरुणीशी झाला होता. हा विवाह अशोक चौधरी  व रेश्मा रफिक खान यांनी दीड लाख रुपये घेऊन घडवून आणलेला होता. लग्नानंतर चार-पाच दिवसांनी दि.६  रोजी वधूची कथित मावस बहीण रेश्मा उर्फ मीना हिने रूपालीच्या आईची तब्येत बरी नसून तिला आईला भेटण्यासाठी घेऊन जाते, असे सांगून गेल्यानंतर रूपाली ही परत आलीच नाही.  तिघांशी संपर्क साधला, पण ते मिळून आले नाही.त्यातच अशोक चौधरी यांच्याविरुद्ध चाळीसगाव पोलिस ठाण्यात अशाच फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल असून तो अटक असल्याचे समजले. त्याची खात्री झाल्यानंतर सोमवारी लग्न लावून देतो, म्हणून दीड लाख रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी अशोक कडू चौधरी, रेश्मा रफी खान व रूपाली (खरे नाव माहित नाही) या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे व हेडकॉन्स्टेबल सुधाकर पाटील करीत आहे.

चाळीसगाव व धरणगावातही गुन्हे दाखलअशोक चौधरी व त्याच्या साथीदार महिलांविरुद्ध लग्न लावून देण्याच्या नावाखाली तरुणांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी चाळीसगाव तसेच धरणगाव येथेही गुन्हे दाखल असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगावmarriageलग्नFaizpurफैजपूरCrime Newsगुन्हेगारी