चार वर्षांत ३,८३,३९६ खातेदारांनी नियमित भरले कृषी कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:29 AM2021-03-04T04:29:19+5:302021-03-04T04:29:19+5:30

जळगाव : २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून २०१९ पर्यंत जिल्हा बँकेच्या ३ लाख ८३ हजार ३९६ खात्यांमध्ये नियमित कर्ज भरणा ...

In four years, 3,83,396 account holders regularly repaid agricultural loans | चार वर्षांत ३,८३,३९६ खातेदारांनी नियमित भरले कृषी कर्ज

चार वर्षांत ३,८३,३९६ खातेदारांनी नियमित भरले कृषी कर्ज

Next

जळगाव : २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून २०१९ पर्यंत जिल्हा बँकेच्या ३ लाख ८३ हजार ३९६ खात्यांमध्ये नियमित कर्ज भरणा करण्यात आला आहे. शासनाच्या कर्जमाफी योजनेत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते. आणि नियमित कर्ज भरल्याने त्यांना कर्जमाफी योजनेपासून वंचित रहावे लागले. त्यांना काही रक्कम परत मिळणार आहे. त्यामुळे त्यांना या योजनेचा फायदा होईल. जिल्हा सहकार खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार चार वर्षात आतापर्यंत दोन हजार १४३ कोटी १५ लाख रुपये एवढ्या कर्ज रकमेचा नियमित भरणा करण्यात आला आहे. त्यात ज्यांनी नियमित कर्ज भरले आहे. त्यांना पहिल्या वर्षासाठी ५० हजार, दुसऱ्या वर्षासाठी १५ हजार आणि त्यापुढील वर्षासाठी साडेसात हजार रुपये मिळणार आहे.

आकडेवारी- खाते क्रमांक - रक्कम

२०१५-१६ १५५६७२ - ९४४ कोटी ९३

२०१६-१७ १०२७१९ - ५६५ कोटी ४३

२०१७-१८ ६१०८६ - ३२५कोटी ६४

२०१८-१९ ६३९१९ - ३०कोटी ७०८

Web Title: In four years, 3,83,396 account holders regularly repaid agricultural loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.