एकाच रात्रीत फोडल्या गोडाऊनसह चार टपऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 21:33 IST2019-09-01T21:33:48+5:302019-09-01T21:33:52+5:30
गणपूर येथील प्रकार : १६ हजारांचे साहित्य लंपास

एकाच रात्रीत फोडल्या गोडाऊनसह चार टपऱ्या
चोपडा : तालुक्यातील गणपूर येथे किराणा दुकानाच्या गोडवूनसह चार पानटपऱ्या अज्ञात चोरट्यांनी फोडून १६ हजार ४०० रुपयांचे किराणा साहित्य चोरून नेले.
३१ आॅगस्ट रोजी रात्री १० ते १ सप्टेंबर रोजीच्या सकाळी ६:३० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी बस स्थानक परिसरातील किराणा दुकानाच्या गोडाऊनमधून साहित्य चोरले. तसेच परिसरातील प्रवीण जिजाबरव पाटील, सुरेश यशवंत पाटील, प्रकाश शिवदास वानखेडे यांच्या पानटपऱ्यांची कुलुपे लोखंडी तोडून त्यातील साहित्य असे एकूण १६ हजार ४०० रुपयांचा माल चोरला.
याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात तुळशीराम युवराज गोसावी (३५), रा. गणपूर,ता.चोपडा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक भीमराव नंदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजू महाजन करीत आहेत.
गाव व परिसरात सातत्याने घरफोडी, दुकानांतून साहित्य चोरीच्या, तसेच सोने, चांदी, इतर मौल्यवान साहित्य चोरीच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. यामुळे गावात भीतीदायक वातावरण परसले आहे.