पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे शेकोटीत स्फोट, चौघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 13:14 IST2020-02-13T13:13:53+5:302020-02-13T13:14:13+5:30
नगरदेवळा, जि. जळगाव : पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे बसस्टँड परीसरात शेकोटीमध्ये स्फोट होऊन चार जण जखमी झाले. ही घटना ...

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे शेकोटीत स्फोट, चौघे जखमी
नगरदेवळा, जि. जळगाव : पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे बसस्टँड परीसरात शेकोटीमध्ये स्फोट होऊन चार जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. एका जखमीला चाळीसगाव येथे हलविण्यात आले आहे.
सकाळी काही तरूण थंडीमुळे शेकोटीजवळ अंग शेकत असताना कचऱ्यात फेकलेल्या स्प्रेच्या डब्ब्याचा स्फोट होऊन त्यातील द्र्रावणासह जळालेल्या प्लॅस्टिकचे तुकडे तरूणांच्या अंगावर उडाले व अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. यामुळे कपडे व त्वचा जळून भोला उर्फ रामसिंग अशोक राजपूत, संजय दगडू राजपूत, किशोर श्यामराव वाने, माधवराव हरी पाटील हे भाजले गेले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. यातील गंभीर भोला राजपूत यास चाळीसगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.