कारने कट मारल्याने दुचाकीवरील चार जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:20 IST2019-02-27T00:19:49+5:302019-02-27T00:20:07+5:30
पारोळा : येथील राष्ट्रीय महामार्ग सहावरील हिरापूर-म्हसवे माथ्यावर जळगावकडून धुळेकडे जाणाऱ्या एका अज्ञात कारने पळासखेडे येथील एका मोटारसायकलला कट ...

कारने कट मारल्याने दुचाकीवरील चार जण जखमी
पारोळा : येथील राष्ट्रीय महामार्ग सहावरील हिरापूर-म्हसवे माथ्यावर जळगावकडून धुळेकडे जाणाऱ्या एका अज्ञात कारने पळासखेडे येथील एका मोटारसायकलला कट मारल्याने यात चार जण जखमी झाले. दोन गंभीर असून त्यांना धुळे येथे हलविण्यात आले.
याबाबत पळासखेडे येथील राजेंद्र मराठे यांनी माहिती दिली की, गावातील परमेश्वर हिलाल तांदळे, (३५), सुनंदाबाई मुरलीधर पाटील (५५), चेतन परमेश्वर पाटील हे मोटारसायकलवर (एम.एच.१९-डी.एच.-८६६५) लग्नाला जात होते. यावेळी गावातील तरुण सुभाष शंकर म्हस्के (२४) यालाही मोटारसायकलवर बसून घेतले.
पारोळाकडे येत असताना ८.४५ वाजता समोरून येणाऱ्या कारने कट मारल्याने सदर मोटारसायकलवर असलेल्या चारही जणांना जोरदार मार लागला. त्यात परमेश्वर तांदळे व सुनंदाबाई पाटील यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना धुळे येथे हलविण्यात आले. याबाबत पुढील तपास सुरू आहे.