भरधाव ट्रकच्या धडकेने चौघे जखमी

By Admin | Updated: June 5, 2017 18:01 IST2017-06-05T18:01:02+5:302017-06-05T18:01:02+5:30

पती गंभीर : पत्नीसह मुलांना किरकोळ जखम

Four people were injured in the firing by the truck | भरधाव ट्रकच्या धडकेने चौघे जखमी

भरधाव ट्रकच्या धडकेने चौघे जखमी

ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.5 - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरून शहरातील कुटुंब जखमी झाल़े पती गंभीर असून पत्नीसह दोघा मुलांना दुखापत झाली़ हा अपघात हॉटेल यशवंत समोर सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास झाला़
अरुण मुकुंदा सातदिवे हे दुचाकी (एम़एच़19 सी़बी़4643) वरून वरणगावहून जळगावकडे जात असताना पाठीमागून आलेला भरधाव ट्रक (डब्ल्यू़बी़23 सी़9162) ने जोरदार धडक दिल्याने अरुण सातदिवे गंभीर जखमी झाले तर त्यांची पत्नी सीमा (20, नारायण नगर, घोडेपीर बाबाजवळ, भुसावळ) तसेच दीक्षा दीपक अहिरे (वय 4, रा़नंदुरबार) व कोमल विजय साळवे (12, ठाकूर नगर, जळगाव) जखमी झाल़े ट्रक चालक अपघातानंतर पसार झाला़ 

Web Title: Four people were injured in the firing by the truck