भुसावळ विभागात चार अधिका:यांच्या बदल्या

By Admin | Updated: June 4, 2017 12:38 IST2017-06-04T12:38:06+5:302017-06-04T12:38:06+5:30

चार सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केल्या आहेत़ बदली झालेले अधिकारी सोमवारी पदभार घेण्याची शक्यता आहे.

Four officers in Bhusawal section: Transfers | भुसावळ विभागात चार अधिका:यांच्या बदल्या

भुसावळ विभागात चार अधिका:यांच्या बदल्या

>ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.4 - प्रशासकीय कार्यकाळ पूर्ण करणा:या चार सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केल्या आहेत़ बदली झालेले अधिकारी सोमवारी पदभार घेण्याची शक्यता आहे.
भुसावळ शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक मारोती मुळूक यांची भुसावळ नियंत्रण कक्षात बदली झाली आह़े त्यांच्या जागी जळगाव शहर पोलीस ठाण्याचे दीपक गोविंद गंधाले येत आहेत़
निंभोरा पोलीस ठाण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे प्रकाश मारोतराव वानखेडे यांची बदली झाली आह़े सावदा पोलीस ठाण्यात सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ यांची बदली झाली असून ते नशिराबाद येथून बदलून येत आहेत़
वरणगावचे सहाय्यक निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांची पोलीस अधीक्षकांचे वाचक म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी अधीक्षकांचे वाचक जगदीश प्रल्हाद परदेशी येत आहेत़ 3 रोजी अधीक्षक कराळे यांनी निरीक्षकांसह 12 सहाय्यक निरीक्षकांच्या बदलीचे आदेश काढल़े 

Web Title: Four officers in Bhusawal section: Transfers