दोन अपघातात चार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2017 00:30 IST2017-02-22T00:30:44+5:302017-02-22T00:30:44+5:30

पहूर व पातोंडा : साखरपुडा व कामातून परततानाची घटना

Four killed in two accidents | दोन अपघातात चार ठार

दोन अपघातात चार ठार

पहूर/चाळीसगाव : जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार झाले असून, चार जण जखमी झाले. पहिला अपघात पहूर, ता. जामनेर येथे, तर दुसरा अपघात पातोंडा, ता. चाळीसगाव येथे झाला.
जामनेर तालुक्यातील लहासर (रामपूर) तांड्यावरील चव्हाण परिवार मालखेडा तांडा (ता.पाचोरा) येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. मालखेडा येथून साखरपुडा आटोपून एमएच-१९-एई-८७३९ क्रमांकाच्या रिक्षाने चव्हाण कुटुंबिय घरी परतत होते. तेव्हा पहूरजवळ पाचोरा रस्त्यावर मालवाहतूक एमएच-२० डीजे-९१९९ क्रमांकाच्या जीपची समोरासमोर धडक झाली. यात रिक्षाचा चुराडा झाला. अपघातात हरी बालचंद चव्हाण (६५) हे जागीच ठार झाले, तर ममराज भिला चव्हाण (६०), सुदाम उखा चव्हाण (५०), शेषराव रतन चव्हाण (६५), दरबार प्रेमराज चव्हाण व आनंदा मैताब चव्हाण हे पाच जण जखमी झाले. वैद्यकीय अधिकारी डॉ.सुजित पाटे यांनी प्राथमिक उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. यातील शेषराव रतन चव्हाण यांचा जळगाव येथे मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सरपंच प्रदीप लोढा,श्याम सावळे, संजय देशमुख, शंकर राजपूत, पोलीस कर्मचारी शिवाजी पाटील, प्रवीण देशमुख, भास्कर बडगुजर यांच्यासह नागरिकांनी मदत केली.
पारोळा तालुक्यातील जोगलखेडा येथील प्रवीण बापू  आंभोरे (२१) व सचिन गणेश चव्हाण (२७) हे दोघे चाळीसगाव येथे खासगी कामासाठी आले होते. परतत असताना ही दुर्घटना घडली. हे दोघे चाळीसगावहून मोटारसायकलने (एमएच-१८-सीजी-४२२९) जोगलखेड्याकडे जाताना समोरून भरधाव वेगाने येणाºया वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही जागीच ठार झाले. ही घटना घडताच वाहनचालक तेथून पसार झाला. चाळीसगाव शहर पोलीसात दीपक बापू आंभोरे यांच्या खबरीवरुन अज्ञात वाहनचालकािवरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
तपास पोहेकाँ धर्मराज पाटील करीत आहेत.
(वार्ताहर)
 

Web Title: Four killed in two accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.