दहिगावच्या इसमाला चार महिन्यात चौथ्यांदा सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2017 12:16 IST2017-05-25T12:16:00+5:302017-05-25T12:16:00+5:30

सापाची बदले की आग की योगायोग, गावात रंगतेय चर्चा

Four-fourths of the snake bite in Dehigaon four month | दहिगावच्या इसमाला चार महिन्यात चौथ्यांदा सर्पदंश

दहिगावच्या इसमाला चार महिन्यात चौथ्यांदा सर्पदंश

 दहिगाव, ता़ यावल, दि.25 - एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चौथ्यांदा गावातील एकाच इसमाला सर्पदंश झाल्याने गावात हा विषय चर्चेचा बनला आह़े गणेश देवीदास मिस्त्री (सुतार, 40) असे सर्पदंश झालेल्या इसमाचे नाव आह़े एका संकटातून सहीसलामत बाहेर पडत नाही तोच पुन्हा संकट येत असल्याने त्याच्यासह कुटुंबांपुढेही काय करावे ? असा पेच पडला आह़े

प्रथम व दुस:या केळी बागेत उघडय़ावर शौचास बसल्यानंतर त्यास सर्पदंश झाला होता. त्यानंतर 12 मे रोजी पुन्हा झाडाखाली स्वच्छता करीत असताना सर्पाने चावा घेतला़ या संकटातून तो बाहेर पडत नाही, तोच 24 रोजी सकाळी पुन्हा स्नानगृहात त्याच्या पायाला सर्पदंश झाला़ तातडीने शेजारच्यांनी त्यास यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल़े प्रत्येक संकटातून देव तारी त्याला कोण मारीचा प्रत्यय गणेश मिस्तरी यांच्याबाबत घडत आह़े गुरुवारी कोब्रा जातीच्या सर्पाने चावा घेतल्याचे माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली़

Web Title: Four-fourths of the snake bite in Dehigaon four month