तुकारामवाडीत मारामारी करणाऱ्या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 12:24 PM2020-03-02T12:24:41+5:302020-03-02T12:24:51+5:30

जळगाव : तुकारामवाडीत जुन्या वादातून आपसात मारामारी करणाºया भूषण विजय माळी (१९), दत्तू उर्फ गोलु नारायण चौधरी (२७), आकाश ...

 Four arrested in Tukaramwadi clash | तुकारामवाडीत मारामारी करणाऱ्या चौघांना अटक

तुकारामवाडीत मारामारी करणाऱ्या चौघांना अटक

Next

जळगाव : तुकारामवाडीत जुन्या वादातून आपसात मारामारी करणाºया भूषण विजय माळी (१९), दत्तू उर्फ गोलु नारायण चौधरी (२७), आकाश रवींद्र मराठे व एक अल्पवयीन मुलाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. शनिवारी सायंकाळी सात वाजता हा वाद झाला.
या तिघांजवळून सुरा, लोखंडी आसारी व लाकडी दांडा हस्तगत करण्यात आला आहे. या चौघांनी जमावबंदी आदेशाचेही उल्लंघन केले. त्यांच्याविरुध्द कलम १६० व आर्मअ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस कर्मचारी गोविंदा विश्राम पाटील यांनी फिर्याद दिली. सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी, सचिन पाटील, गोविंदा पाटील व असीम तडवी यांनी घटनास्थळावर धाव घेऊन वाद सोडविला व चौघांना ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलाला समज देवून सोडून देण्यात आले आहे.

Web Title:  Four arrested in Tukaramwadi clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.