दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले धुळ्याचे चौघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:11 IST2021-07-03T04:11:49+5:302021-07-03T04:11:49+5:30
03 एचएसके02 अमळनेर : गस्तीवर असलेल्या मारवड पोलिसांना दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी २ रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ...

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले धुळ्याचे चौघे अटकेत
03 एचएसके02
अमळनेर : गस्तीवर असलेल्या मारवड पोलिसांना दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी २ रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास अमळगाव येथे आढळून आली. पोलिसांनी त्यांच्याजवळील कार, दोर,चाकू, कटर, मिरची पावडर असे एक लाखाचे साहित्य जप्त करून त्यांना अटक केली आहे.
सहाययक पोलीस निरीक्षक राहुल फुला, पोलीस उपनिरीक्षक वैभव पेठकर, हेडकॉन्स्टेबल विजय होळकर, किरण पाटील, फिरोज बागवान, सुनील आगोने, सुनील तेली, प्रशांत पाटील, तुषार वाघ, भास्कर चव्हाण हे २ रोजी पहाटे अमळगाव भागात गस्त घालत असताना बस स्टॅण्ड परिसरात त्यांना एक इसम रस्त्याच्या कडेला संशयितरित्या टेहळणी करीत असल्याचे दिसून येताच पोलिसांनी त्याला हटकले असता तो पळून गेला. यामुळे त्याच्यावर अधिकच संशय बळावल्याने त्यांनी पुढे जाऊन पाहणी केली असता तेथे पांढऱ्या रंगाची (एम.एच. ०६ ए.एफ. ३१९५)कार दिसली. जवळ जाऊन पाहिले असता त्यात नईम शहा सलीम शहा (वय ३०, रा. आझाद नगर),मोहम्मद अर्षद मोहम्मद बशीर अन्सारी (वय २९ रा.शहिद अब्दुल हमीद नगर), आबिद शहा पिरन शहा फकीर (वय २६ रा शहीद नगर), अतिकुर रहमान मोहम्मद सलीम अन्सारी (वय ३७, रा आझाद नगर)हे धुळ्यातील चौघे बसलेले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना पळून गेलेल्या इस्माबाबत विचारले असता तो त्यांच्यासोबतच असल्याचे त्यांनी कबूल करून त्याचे नाव ,गाव सांगण्यास नकार दिला. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने गाडीची झाडाझडती घेतली असता त्यांच्याजवळ दोर, मिरची पावडर ,२ चाकू, ७ कटर, चिलम असे साहित्य आढळून आल्याने ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची पोलिसांना खात्री झाली. त्यांच्याजवळील कार व मोबाइल, चाकू, कटर, मिरची पावडर असे सर्व साहित्य असे एकूण १ लाख ३ हजार ११० रुपयांचे जप्त करून चारही आरोपींना मारवड पोलीस स्टेशनला अटक करण्यात आली. आरोपींना अमळनेर न्यायालयात हजर केले असता न्या.अग्रवाल यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस करीत आहे.
कॅप्शन - पकडलेले चौघे आरोपी व जप्त केलेले साहित्य.