शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
"कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
6
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
7
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
8
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
9
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
10
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
11
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
12
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
13
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
14
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
16
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
17
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
18
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
19
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
20
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव

एटीएमचा कोड मिळवून गंडा घालणा-या दिल्लीच्या चार ठगांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:28 IST

बँकेतून मॅनेजर बोलतोय, तांत्रिक कारणामुळे तुम्हाला एटीएम कार्ड बदल करावे लागणार आहे असे सांगून ग्राहकांकडून एटीएमचा कोड व १६ अंकी क्रमांक मिळवून आॅनलाईन गंडा घालणा-या दिल्लीच्या टोळीचा जळगाव सायबर ठाण्याच्या पोलिसांनी पदार्फाश केला असून चार जणांना अटक केली आहे. 

ठळक मुद्दे  जळगावात प्राचार्याला गंडा   पैशासाठी सोडले शिक्षण

 

जळगाव: बँकेतून मॅनेजर बोलतोय, तांत्रिक कारणामुळे तुम्हाला एटीएम कार्ड बदल करावे लागणार आहे असे सांगून ग्राहकांकडून एटीएमचा कोड व १६ अंकी क्रमांक मिळवून आॅनलाईन गंडा घालणा-या दिल्लीच्या टोळीचा जळगाव सायबर ठाण्याच्या पोलिसांनी पदार्फाश केला असून चार जणांना अटक केली आहे. भुपेंदरकुमार मुकेशकुमार (२०), अमन बालकिशन लांबा (२१), राहूल कौशिक सुरेशकुमार (२१) व नितीन राकेश टंडन (२४) सर्व रा. नवी दिल्ली असे अटक केलेल्यांची नावे असून त्यांच्याकडून दहा मोबाईल व लॅपटॉप, आयपॉड असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दरम्यान अटकेतील चारही जणांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता २० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.भाड्याच्या घरातून चालायचा उद्योगपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चौकडीने दिल्ली येथे एका भाड्याने फ्लॅट घेऊन तेथे कॉल सेंटरव्दारे अनेकांचे खाते क्रमांक, एटीएमचा पासवर्ड, पिन मिळवून त्या माध्यमातून आॅनलाईन गंडविण्याचा धंदा सुरु होता. फसवणूक करुन संबंधितांच्या खात्यातून आॅनलाईन शॉपिंग करुन महागड्या वस्तू खरेदी करायच्या व त्या कमी किमतीत विक्री केल्या जावून चौघे पैसे मिळवित असल्याची माहिती समोर आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचायार्ला गंडाजळगाव शहरारातील रहिवासी डॉ. अजय ओंकारनाथ दाहाड हे चांदवड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राचार्य आहेत.  त्यांच्या मोबाईलवर फोन करुन मी एस.बी.आय.क्रेडीट कार्ड हेडच्या कार्यालयातून बोलत असून तुमचे अगोदर एसबीआय बॅकेचे प्राईम कार्ड असल्याने त्या कार्डसाठीची वार्षिक शुल्क ३५३९  रुपये तुमच्या खात्यातून वजा करण्यात आली असून ती तुम्हाला परत करावयाची असे भासवून क्रेडीड कार्ड वरील  सोळा अंकी व ओटीपी मिळवून १ लाख ६६ हजार ८०० रुपयांचा आॅनलाईन गंडा घातला होता. याप्रकरणी २८ मार्च रोजी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाल होता. 

असा लागला संशयितांचा छडाडॉ. दाहाड यांच्या फोनवर आलेला क्रमांक तसेच दाहाड यांच्या खात्यातून ज्या वस्तूंची आॅनलाईन खरेदी करण्यात आली होती. त्या दुकानदाराच्या खात्याची सायबर पोलिसांनी माहिती मिळविली. त्यानुसार संशयित दिल्ली येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण निकम याना दिल्ली येथे तपासकामी पथक पाठविण्याचे आदेश दिले होते. उपनिरीक्षक अंगत नेमाणे यांच्या नेतृत्वाखाली पथक दिल्लीला गेले होते. दोन दिवस ठाण मांडल्यानंतर पक्की माहिती मिळाल्यावर पथकाने सापळा रचून सुरुवातीला म्होरक्या भुपेंदर सिंग कुमार  व अमन लांबा  या दोघांना अटक केली. त्यानंतर राहूल कुमार व नितीन टंडन यांच्या मुसक्या आवळल्या.

मास्टरमाईंडची लिव्ह इन रिलेशनमध्ये राहून फसवणूकअटकेतील चौघे पदवीची द्वितीय तसेच तृतीय वषार्ला शिकत होते. मात्र पैसे कमविण्याचा सोपा मार्ग सापडल्याने सर्वांनी शिक्षण सोडले. भूपेंदर हा गुन्ह्यातील मास्टर माईंड आहे. तो यापूर्वी एका कॉलसेंटरमध्ये कामाला होता. उत्कृष्ट संभाषणाच्या कौशल्याने पोलीसही अवाक झाले आहेत. तो त्याच्या प्रेयसीसोबत भाड्याच्या फ्लॅटमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो. प्रेयसीमुळे त्याची अमनसोबत मैत्री झाली त्यानंतर दोघांनी दुसरा फ्लॅट घेवून हा उद्योग सुरु केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव