पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 17:27 IST2021-02-20T17:26:25+5:302021-02-20T17:27:10+5:30
माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह विनय जकातदार हे देखील पॉझिटिव्ह आले आहेत.

पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ कोरोना पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोरा : पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले आहे.
दि. ११ रोजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पाचोरा दौऱ्यावर आले होते. पाटील हे कोरोनाबाधित झाल्याने संपर्कातील कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच पाचोरा भडगावचे माजी आमदार दिलीप ओंकार वाघ यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे संपर्कातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान दिलीप वाघ हे मुंबई येथे तपासणीसाठी गेले असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. कोरोनाची लक्षणे आढळली असली तरी घाबरण्याचे कारण नाही. त्यातच उपचार सुरु असून किरकोळ लक्षणे आढळल्याचे खुद्द वाघ यांनीच सोशल मीडियावर सांगितले आहे. दिलीप वाघ यांचे सहाय्यक राष्ट्रवादीचे भडगाव येथील विनय जकातदार हे देखील पॉझिटिव्ह असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर संदेश दिला आहे.