जळगावचे माजी आमदार शरद वाणी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:19 IST2017-10-11T00:18:39+5:302017-10-11T00:19:40+5:30
अंत्ययात्रा बुधवारी सकाळी 9 वाजता रहात्या घरापासून

जळगावचे माजी आमदार शरद वाणी यांचे निधन
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 10 - विधान परिषदेचे माजी सदस्य अॅड. शरद सोनू वाणी (वय 77) यांचे मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजता नवीपेठेतील राहत्या घरीच हृदय विकाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी सकाळी 9 वाजता रहात्या घरापासून निघेल.
वाणी हे 1992 ते 2004 या कालावधीत दोन वेळा विधान परिषदेवर निवडून आले होते. तसेच तत्कालीन नगरपालिकेवर उपनगराध्यक्ष म्हणूनही निवडून आले होते.
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे ते घनिष्ठ मित्र होते. निधनाची वार्ता समजताच सुरेशदादा जैन यांनी तातडीने नवीपेठेतील त्यांच्या घरी जाऊन वाणी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
शरद वाणी यांच्या पश्चात प}ी शारदा, मुले शैलेश, चंद्रशेखर व मुलगी रोहिणी असा परिवार आहे.