माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगरला आता नगरपंचायतीचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 23:26 IST2017-12-04T23:24:07+5:302017-12-04T23:26:13+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज भरण्यास सुरु होण्यापूर्वीच अधिसूचना जारी

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगरला आता नगरपंचायतीचा दर्जा
आॅनलाईन लोकमत
मुक्ताईनगर,दि.४- मंगळवार दि. ५ पासून मुक्ताईनगर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होणार होती. त्यापूर्वीच सोमवारी रात्री मुक्ताईनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर करण्याची अधिसूचना प्राप्त झाली. नगरविकास विभागाकडून काढण्यात आलेल्या अधिसूचनमुळे सोमवारपासून येथे नगरपंचायत अस्तित्वात आली आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी धक्का तंत्राचा वापर करीत घोषणेप्रमाणे येथे नगरपंचायत केली आहे. नगरविकास विभागाने ४ डिसेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेत मुक्ताईनगर ग्रामपंचायतीचे ग्रामीण क्षेत्र हे नागरी क्षेत्रात रूपांतरीत करून मुक्ताईनगर येथे नगरपंचायत अस्तित्वात आल्याचे नमूद केले आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतीचे प्रशासक म्हणून तहसीलदार रचना पवार यांची नेमणूक करण्यात आली आहे
दरम्यान, याअधिसूचनेमुळे मुक्ताईनगर ग्रामपंचायतीसाठी सुरु होणारा निवडणूक कार्यक्रम रद्द होणार आहे
या निर्णयामुळे पं.स.सदस्या भारती छोटू भोई यांना पदावरुन दूर करण्यात आल्याचा आदेश ग्रामविकास विभागाने काढला आहे.
मुक्ताईनगर येथे नगरपंचायत व्हावी, यासाठी अनेकांचा आग्रह होता. अडीच महिन्यापूर्वी नगरपंचायत होणार असे मी सांगितले होते. दिलेला शब्द पाळला आहे. आज याबाबत अधिसूचना निघाली आहे
- आमदार एकनाथराव खडसे,