चाळीसगाव ( जि. जळगाव) : भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर पांडुरंग चौधरी (५०) यांची दुचाकी अडवून त्यांच्यावर धारदार कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास स्टेशनरोडवर घडली.
पुढील उपचारासाठी त्यांना धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चौधरी हे दुचाकीने घराकडे जात असतांना हल्लेखोरांनी त्यांची दुचाकी अडवून त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार केले. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला कोणी केला या बाबतची माहिती कळू शकली नाही.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रभाकर चौधरी यांच्या कार्यालयाचे उदघाटन झाले होते.