गुढे येथे फुलला भक्तीचा मळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST2021-07-21T04:13:29+5:302021-07-21T04:13:29+5:30

या २२ दिवसांमध्ये सकाळ आणि संध्याकाळ आरती, महाप्रसाद आणि रात्री कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केले जात होते. दि. ...

Flower of devotion at Gudhe | गुढे येथे फुलला भक्तीचा मळा

गुढे येथे फुलला भक्तीचा मळा

या २२ दिवसांमध्ये सकाळ आणि संध्याकाळ आरती, महाप्रसाद आणि रात्री कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केले जात होते. दि. २० रोजी आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण ग्रामस्थांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांसाठी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता सवाद्य संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. सायंकाळी पाच वाजता पालखी मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

संपूर्ण महाराष्ट्रात एकूण सतरा पालख्या वेगवेगळ्य़ा ठिकाणी संत बाळूमामाच्या भक्तीचा प्रसार करत आहेत. गुढे येथील पालखीचे नेतृत्व बापूमामा कारभारी करत आहेत. पालखीमध्ये बाळूमामाच्या मेढ्यांचे शंभरावर सेवेकरी आहेत. प्रत्येक सेवेकरी स्वेच्छेने आपली सेवा देत असतात. रात्री परमेश्वर महाराज नांदगावकर यांचे कीर्तन आयोजित केले होते. दि. २१ रोजी उपासाचे पारणे सोडण्यासाठी संपूर्ण गाव तसेच पालखी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

200721\20jal_12_20072021_12.jpg

आषाढी एकादशीनिमित्त पालखी मिरवणूक, महाप्रसाद

Web Title: Flower of devotion at Gudhe