पातोंडा येथे झेंडावंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST2021-08-18T04:21:32+5:302021-08-18T04:21:32+5:30
पातोंडा : येथील ग्रामसचिवालयात ध्वजारोहण सरपंच भरत देवाजी बिरारी यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच नितीन पारधी, ग्रा. पं. सदस्य ...

पातोंडा येथे झेंडावंदन
पातोंडा : येथील ग्रामसचिवालयात ध्वजारोहण सरपंच भरत देवाजी बिरारी यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच नितीन पारधी, ग्रा. पं. सदस्य संदीपराव पवार, सोपान लोहार, के. आर. पाटील, दिलीप बोरसेसह सर्व ग्रा. पं. सदस्य, ग्रामविकास अधिकारी बी. वाय. पाटील, कर्मचारी वर्ग, तलाठी योगेश पाटील, शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ हजर होते.
पातोंडा माध्यमिक शाळा
येथील श्री दत्त विद्या मंदिर माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहण मुख्याध्यापक राजेंद्र शिंगाणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण वैद्यकीय अधिकारी रोशन राजपूत यांच्या हस्ते पार पडले. यावेळी वैद्यकीय अधिकारी प्रशांत कुलकर्णी, डॉ. संजय पाटील, परिचारिका, आरोग्य सहायक आदी सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
पीक सोसायटी
येथील पीक संरक्षक सहकारी सोसायटीतर्फे ध्वजारोहण अध्यक्ष नेहरू रामदास पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सचिव व सर्व सदस्य हजर होते.