वाडे येथे ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST2021-08-18T04:21:39+5:302021-08-18T04:21:39+5:30
वाडे ग्रामपंचायत प्रथम वाडे ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणाचा मान देशहितासाठी आपले जीवन समर्पित करत असलेल्या जवानांच्या मातेला ध्वजारोहण करण्याचा मान दिला. ...

वाडे येथे ध्वजारोहण
वाडे ग्रामपंचायत
प्रथम वाडे ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणाचा मान देशहितासाठी आपले जीवन समर्पित करत असलेल्या जवानांच्या मातेला ध्वजारोहण करण्याचा मान दिला. सायजाबाई कौतिक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
हनुमान विकासो
वाडे हनुमान वि. का. सहसेवा सोसायटी लि. वाडे या संस्थेचे ध्वजारोहण संचालक रामदास शंकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
वाडे जि. प. प्राथमिक शाळा
जि. प. प्राथमिक मराठी मुला, मुलींची शाळा वाडे या शाळेचे ध्वजारोहण लोकमतचे वार्ताहर अशोक परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले.
वाडे नेताजी सुभाष ग्राम वाचनालय
वाडे येथील नेताजी सुभाष
ग्राम वाचनालयाचे ध्वजारोहण उपाध्यक्ष शालिकराव पुंडलिक महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
वाडे माध्यमिक विद्यालय
माध्यमिक विद्यालय, वाडे या शाळेचे ध्वजारोहण मुख्याध्यापक एन. एस. बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले.
तिखीवस्ती जि. प. शाळा
जि. प. प्राथमिक तिखीवस्ती शाळा वाडे या शाळेचे ध्वजारोहण वाडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रदीप भास्कर सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक दत्तू पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ हजर होते.
या कार्यक्रमास वाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रजुबाई यशवंत पाटील, हनुमान वि. का. सह सेवा सोसायटीचे चेअरमन विश्वासराव पाटील, माजी अध्यक्ष यशवंत पाटील, जि. प. प्राथमिक मराठी मुला, मुलीची शाळा वाडे या शाळेतील मुख्याध्यापक रमेश हरी पाटील, शोभना पाटील, वाडे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विकासोचे संचालक, वाचनालयाचे संचालक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान व चंद्रशेखर पाटील, पुणे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपाली मोरे, तलाठी रत्नदीप माने, आजी-माजी सैनिक, अंगणवाडी सेविका व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.