पारोळ्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST2021-08-18T04:21:25+5:302021-08-18T04:21:25+5:30
ग. स. सोसायटी ग. स. सोसायटी शाखा पारोळा येथील ध्वजारोहण कारगिल युद्धात पदक प्राप्त सेवानिवृत्त कॅ. हिंमतराव पाटील ...

पारोळ्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण
ग. स. सोसायटी
ग. स. सोसायटी शाखा पारोळा
येथील ध्वजारोहण कारगिल युद्धात पदक प्राप्त सेवानिवृत्त कॅ. हिंमतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी त्यांचे स्वागत विभागीय अधिकारी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाखाधिकारी जयवंत पाटील, भीमराव पाटील, अविनाश पवार, युवराज साळी, शरद पवार, सदाशिव पाटील, सचिन पाटील, संजय नेरकर, उत्तम निकम आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शरद पवार यांनी केले.
आरोग्य विभाग न. पा. पारोळा
येथील ध्वजारोहण आरोग्य सभापती नवल नामदेव चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, नगरसेवक संजय पाटील, डी. बी. पाटील यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व कर्मचारी उपस्थित होते.
जि. प. उच्च प्राथमिक शाळा भोंडण दिगर
येथील जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण गावातील सुटीवर आलेले भारतीय सैनिक चंद्रभान साहेबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायतीत ध्वजारोहण भारतीय सैनिक रतिलाल किसन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच वनमाला पाटील, पोलीस पाटील सुभाष पाटील, सदस्य, मुख्याध्यापक प्रशांत पाटील, ग्रामस्थ, शिक्षक शिक्षिका यांच्यासह शरद वाणी उपस्थित होते.
बोहरा सेंट्रर स्कूल
बोहरा सेंट्रल स्कूल येथे ध्वजारोहण संस्थेचे सचिव प्रकाश बोहरा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुकुंद बोहरा, संस्थेचे संचालक बी. जी. पाटील, प्राचार्य शोभा सोनी, वीरेंद्र सखा डॉ. योगेंद्र पवार, संदीप कासार, राधेश्याम जैस्वाल, महेश लोढाया, दत्ता महाजन उपस्थित होते.
बालाजी विद्यालयात स्वातंत्र्य दिन
श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ, संकुलाचे ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष यू. एच. करोडपती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. सचिन बडगुजर, संचालक मंगला करोडपती, सुनील बडगुजर, मोहन बडगुजर, सदस्य सुरेश बडगुजर, मुख्याध्यापक विजय बडगुजर, श्रीकांत पाटील, हेमंत पाटील उपस्थित होते.
ज्ञानदीप बहूद्देशीय संस्था म्हसवे, विद्यालय
माध्यमिक विद्यालय म्हसवे, ता. पारोळा येथील शाळेचे ध्वजारोहण मुख्याध्यापिका सरिता देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेत विविध ऑनलाईन गीतगायन, निंबध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. स्पर्धेत इयत्ता आठवीची पूजा नितीन मिस्तरी, इयत्ता नववी ललिता एकनाथ पाटील, इयत्ता दहावीची भाग्यश्री प्रवीण पाटील यांनी गीतगायन केले. निबंध स्पर्धांमध्ये शुभम देवीदास परदेशी, कलश विकास शिंपी, शुभम प्रवीण पाटील यांनी निबंध स्पर्धांमध्ये सहभागी घेतला. सूत्रसंचालन उपशिक्षक शरद पाटील यांनी केले. यशस्वितेसाठी जितेंद्र पवार, शरद पाटील, शोभा बेहेरे, ललिता सूर्यवंशी, वैशाली पाटील, गोरख पाटील, विजय महाजन, दीपक पाटील, उमाकांत बाविस्कर, विनोद पाटील यांनी सहकार्य केले.
स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय
येथील ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनिल टोळकर, सोमनाथ टोळकर, मुख्याध्यापक टोळकर उपस्थित होते.
केशव माध्यमिक विद्यालय
केशव माध्यमिक विद्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक के. डी. वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थाध्यक्ष प्रदीप चौधरी, संचालक कैलास मनोहर चौधरी, मुख्याध्यापक अशोक भामरे उपस्थित होते.
जि. प. उच्च प्राथमिक शाळा, सांगवी
सांगवी येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेत कोमल बाबुराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोना योद्धा म्हणून सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच वैशाली प्रवीण पाटील, उपसरपंच आनंद रवींद पाटील, नथ्थू मखराम वंजारी, प्रवीण पाटील, मुख्याध्यापक विजय नामदेव भामरे, अण्णा चौधरी आदी उपस्थित होते.
श्री व्यंकटेश माध्यमिक विद्यालय
श्री व्यंकटेश माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहण प्रतिष्ठित व्यापारी केशव क्षत्रिय यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सुनंदा पाटील, शिक्षक यू. जी. पाटील, सतीश शामनाणी, सुनील शामनाणी, आर. पी. सूर्यवंशी, योगेश साळुंखे, शुभांगी पाटील, सुनीता राठोड, शुभम पाटील, रामदास दाभाडे, शरद देवरे आदी उपस्थित होते.