जिल्हाधिका-यांच्या हस्ते ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:22 IST2021-08-17T04:22:30+5:302021-08-17T04:22:30+5:30

कार्यक्रमाच्या सुरुवातीस जळगाव पोलीस दलाच्या पथकाने पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. तर, बॅण्ड पथकाने राष्ट्रगीताची धून वाजविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता खाचणे ...

Flag hoisting by the Collector | जिल्हाधिका-यांच्या हस्ते ध्वजारोहण

जिल्हाधिका-यांच्या हस्ते ध्वजारोहण

कार्यक्रमाच्या सुरुवातीस जळगाव पोलीस दलाच्या पथकाने पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. तर, बॅण्ड पथकाने राष्ट्रगीताची धून वाजविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता खाचणे आणि अपूर्वा वाणी यांनी केले. या कार्यक्रमापूर्वी भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमात यांचा झाला सत्कार

- विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी पार पाडलेल्यांचा सत्कार करण्यात आला. नेहरू युवा केंद्रातर्फे दिला जाणारा जिल्हास्तरीय उत्कृष्ट युवा मंडळ (सन २०१९-२०२०) पुरस्कार तुळजाई बहुउद्देशीय संस्थेला प्रदान केला.

-पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाने सहायक फौजदार शिवाजी पाटील, लीलाकांत महाले, पोलीस हवालदार विजय काळे, शशिकांत पाटील, सुनील दामोदरे, पोलीस नाईक महेश पाटील, पोलीस नाईक संदीप सावळे यांचा सन्मान झाला.

- पोलीस महासंचालकाचे विशेष सेवा पदक पोलीस शिपाई अतुल अंगद मोरे यांना देऊन सन्मानित केले.

- महाआवास अभियान ग्रामीणमधील उत्कृष्ट काम करणा-या संस्था/व्यक्तीअंतर्गत उत्कृष्ट क्लस्टर म्हणून रामजीपाडा, ग्रामपंचायत, अडावद, ता. चोपडा यांचा सन्मान झाला.

- प्रधानमंत्री आवास योजना जिल्हास्तरीय पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मुक्ताईनगर, द्वितीय क्रमांक भुसावळ, तृतीय क्रमांक चाळीसगाव तालुक्याने पटकाविला.

- राज्य पुरस्कृत योजना सर्वोत्कृष्ट तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मुक्ताईनगर, द्वितीय क्रमांक एरंडोल, तृतीय क्रमांक बोदवड तालुक्याने मिळविला.

- कृषी विभागातील किशोर साळुंखे, तुफान खोत, वैशाली पाटील, पांडुरंग महाजन, तुळशीराम पवार, अमोल पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.

Web Title: Flag hoisting by the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.