पाचोरा तालुक्यातील २० गावे ‘पोखरा’ योजनेत सामाविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 05:50 PM2019-08-02T17:50:22+5:302019-08-02T17:51:32+5:30

हवामान अनुकूल कृषी पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने पाचोरा तालुक्यात ‘पोखरा’ योजना राबविली जात आहे. प्रायोगिक तत्वावर या योजनेत पाचोरा तालुक्यातील ११ गावांत प्रारंभ करण्यात आला.

Five villages in Pachora taluka are included in 'Pokhara' scheme | पाचोरा तालुक्यातील २० गावे ‘पोखरा’ योजनेत सामाविष्ट

पाचोरा तालुक्यातील २० गावे ‘पोखरा’ योजनेत सामाविष्ट

googlenewsNext
ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात ११ गावे तर दुसऱ्या टप्प्यात नऊ गावाचा समावेशपाचोरा तालुक्यातील तारखेडा बुद्रूक येथे कार्यशाळेत राजेंद्र एडके यांचे मार्गदर्शन

आत्माराम गायकवाड
खडकदेवळा, ता.पाचोरा, जि.जळगाव : हवामान अनुकूल कृषी पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने पाचोरा तालुक्यात ‘पोखरा’ योजना राबविली जात आहे. प्रायोगिक तत्वावर या योजनेत पाचोरा तालुक्यातील ११ गावांत प्रारंभ करण्यात आला.
प्रोजेक्ट आॅन क्लायमेट रिजीनल अ‍ॅग्रीकल्चर (पोखरा) प्रकल्प राज्य शासन ‘नानासाहेब कृषी संजीवनी प्रकल्प’ या नावाने राबवित आहे. ‘जीपीएस आणि वॉटरशेड मॅप’च्या माध्यमातून पाचोरा तालुक्यातील २० गावांची त्यासाठी निवड झाली आहे. योजनेचा शुभारंभ तालुक्यातील ११ गावांतून करण्यात आला. प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवली जात आहे. निर्धारित वेळेपेक्षा कमी कालावधीतच ही योजना पूर्ण करण्यासाठी कृषि विभाग प्रयत्न करीत आहे. आता पहिल्या टप्प्याचे नियोजन केले जात आहे. ११ गावांमध्ये योजनेचा लाभ दिला जाणार आहे. दुसºया टप्प्यात नऊ गावांना लाभ दिला जाणार आहे. या योजनेचे लाभार्थी निवड करण्यासाठी गावात ग्राम कृषी संजीवनी समिती निर्माण केल्या आहेत. या समितीने ठराव घेऊन निवडलेले लाभार्थीच योजनेसाठी पात्र ठरतात. यातून वानिकी आधारित शेती अंतर्गत १२ फळझाडांची लागवड करता येते. क्षारपड व चोपन जमिनीचे व्यवस्थापन, फळशेती, एकात्मिक शेती पद्धतीत शेळी, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका, मत्स्यपालन, जमीन आरोग्य सुधारणे अशा अनेक योजनांचा यात समावेश आहे. यासाठी जागतिक बँकेडून चार हजार कोटींचे अर्थसहाय्य मिळणार आहे. हा प्रयोग यशस्वी ठरण्याचे नियोजन कृषी विभागाने पहिल्या टप्प्याचे काम सुरू केले आहे. ही योजना आता पाचोरा तालुक्यातील ११ गावात राबविली जाणार आहे.त्यानंतर दुसºया टप्प्यातील नऊ गावे सामाविष्ट केलेली आहेत.
पहिल्या टप्प्यातील ११ गावे सामाविष्ट
तारखेडा खुर्दे, तारखेडा बुद्रूक, अतुर्ली बुद्रूक, अतुर्ली खुर्दे, अतुर्ली खुर्द, बांबरुड खुर्दे प्र.पा., गाळण बुद्रूक, हनुमान वाडी, पुनगाव, ओझर, भातखंडे खुर्दे या गावांचा समावेश आहे.
दुसºया टप्प्यातील नऊ गावे
दोघी, कळमसरे, कासमपुरे, लोहार, म्हसास,रामेश्वर, सार्वे खुर्दे प्र.भ, शाहापुरे, बंडाळी ही गावे दुसºया टप्प्यात आहेत.
हा प्रकल्प राबविण्यात आलेल्या तारखेडा बुद्रुक, गाळण बुद्रुक, तारखेडा खुर्द व हनुमान वाडी या गावात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत तारखेडा बुद्रुक, बाळद बुद्रुक, तारखेडा खुर्द, हनुमान वाडी या गावांचे कृषी संजीवनी समिती अध्यक्ष, सरपंच, कृषी सहाय्यक व समूह सहाय्यक तसेच सचिन चौधरी, लेखा सहाय्यक उपस्थित होते. कार्यशाळेस लेखाधिकारी राजेंद्र एडके यांनी मार्गदर्शन केले.


पोखरा योजनेत सामाविष्ट गावातील लाभार्थीला आता शासकीय कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही. पोखरा योजनेचा लाभ घेण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीला गठित करण्यात आलेल्या समितीला आधिकार दिले आहेत. त्यामुळे निवडलेले लाभार्थीला संबंधित योजनेतील साहित्य खरेदी करून त्याची बिले सादर करताच लाभार्थीला त्याच्या खात्यावर पैसे जमा केली जातात. समितीची दर महिन्याला बैठक घेण्यात येते. त्यात ज्या शेतकरी लाभार्थींनी अर्ज सादर केला आहे त्या लाभार्थीला पूर्वसंमती दिली जाते. त्या लाभार्थीचे नाव आॅनलाईन करून निवड केली जाते.
-मधुकर दौलतराव पाटील, सरपंच, तारखेडा खुर्द, ता. पाचोरा

Web Title: Five villages in Pachora taluka are included in 'Pokhara' scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.