कार-रिक्षा अपघातात पाच जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 18:26 IST2019-03-22T18:26:32+5:302019-03-22T18:26:44+5:30
दोन जणांचे पाय निकामी

कार-रिक्षा अपघातात पाच जण जखमी
शिंदाड ता पाचोरा : पाचोरा ते मोंढाळे रस्त्यावर रिक्षा व कारची समोरासमोर धडक होऊन रिक्षातील पाच जण जखमी झाले. जखमीतील दोन जणांचे पाय निकामी झाले आहे. हा अपघात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झाला.
या बाबत सविस्तर माहिती पाचोरा येथून पिण्याचे पाणी घेण्यासाठी रिक्षा (क्र. एम.एच. १, क्यू ७४० व मोंढाळेकडून पाचोराकडे येणारी कार (क्र.एम.एच. १९, एएक्स ०३७४) यांची समोरासमोर धडक झाली. यात रिक्षातील संगीता अशोक पाटील (वय ४५), भाऊसाहेब गुलाबराव देशमुख (वय ४७) विष्णु सुभाष नलवाडे (वय ३६) दादाराव व्यकटराव शेळके (वय ३६) कार्तीक अशोक पाटील (वय २०) सर्व रा. निंभोरी, ता, पाचोरा यांच्यासह रिक्षा चालक अशोक पाटील हे जखमी झाले. यातील संगीता अशोक पाटील व भाऊसाहेब गुलाबराव देशमुख या दोघांचे पाय निकामी झाले आहे. अपघातातील सर्व जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.