बी.एस चौधरी
Jalgaon Accident: जळगावच्या एरंडोलमध्ये शेताच्या कंपाऊंडमध्ये सोडलेल्या वीजेचा शॉक लागून एकाच मजूर कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे. ही हृदद्रावक घटना वरखेडी एंरडोल तालुका येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली. मृतांमध्ये आई, मुलगा, सुन आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.
विकास रामलाल पावरा, त्याची पत्नी सुमन विकास पावरा, मुले पवन पावरा, कवल पावरा आणि आई अशा पाच जणांचा मृतांमध्ये समावेश समावेश आहे. ही घटना रात्री घडली असावी. सर्व मृतदेह जळगावच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. वारखेडी गावातील एका शेतकऱ्याने आपल्या शेताचे पिके वन्यप्राण्यांपासून वाचवण्यासाठी शेताच्या भोवती लोखंडी तारांचे कुंपण घातले होते. याच कुंपणाच्या संपर्कात आल्याने घरातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारातील एका शेतात हे आदिवासी कुटुंब वास्तव्यास आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास विजेचा शॉक लागून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक वर्षाची मुलगी सुदैवाने बचावली आहे.