खिरवड व नेहते येथे  पाच दारू भट्टया उद्ध्वस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 18:08 IST2020-11-09T18:05:10+5:302020-11-09T18:08:13+5:30

४२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल केला नष्ट

Five liquor kilns demolished at Khirwad and Nehte | खिरवड व नेहते येथे  पाच दारू भट्टया उद्ध्वस्त 

खिरवड व नेहते येथे  पाच दारू भट्टया उद्ध्वस्त 

रावेर : तालुक्यातील खिरवड व नेहते येथे रावेर पोलिसांनी अकस्मात धाड टाकून तापी नदीकाठच्या पाच अवैध गावठी दारूच्या भट्टया उद्ध्वस्त करून ४२ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल नष्ट केला.
        रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, पोना महेंद्र सुरवाडे व  पोकॉ सुरेश मेढे,  श्रीराम कांगणे, मोगरे आदींच्या पोलीस पथकाने पहाटे पाच वाजेच्या सुमारास तापी नदीकाठच्या खिरवड व नेहते येथे काराई केली असून, अवैध गावठी दारू विक्री व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

 

Web Title: Five liquor kilns demolished at Khirwad and Nehte