शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
3
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
4
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
5
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
6
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
7
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
8
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
9
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
10
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
11
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
12
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
13
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
14
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
15
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
16
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
17
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
18
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
19
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
20
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा

भुसावळ विभागातील पाचही तलाव कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 16:19 IST

असमाधानकारक पावसामुळे भुसावळ विभागातील पाचही तलाव कोरडे राहिल्याने रब्बी हंगामाही संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देरब्बीची पेरणीही संकटातवेल्हाळे तलावाचे लाभक्षेत्र ३६४ हेक्टर असून, आज रोजी २१ टक्के जलसाठा आहे.मोंढाळा तलावाचे लाभ क्षेत्र २६४ हेक्टर, पाणी साठा शून्य टक्के आहे.खंडाळा लाभ क्षेत्र २३२ हेक्टर पाणीसाठा शून्य टक्के, साळशिंगी लाभ क्षेत्र २६१ हेक्टर पाणीसाठा शून्य टक्के, जुनाना लाभ क्षेत्र ३१९ हेक्टर पाणीसाठा शून्य अशी तलावांची स्थिती आहे.

 

 

वरणगाव, ता.भुसावळ : असमाधानकारक पावसामुळे भुसावळ विभागातील पाचही तलाव कोरडे राहिल्याने रब्बी हंगामाही संकटात सापडला आहे.मोसमात अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांचे खरिपाच्या पिकांचे नुकसान तर झालेच, परंतु रब्बीच्या हंगामाकरिता सिंचयानाकरिता पाणी उपलब्ध नसल्याने एक हजार ४४० हेक्टरवरील रब्बीची पेरणी धोक्यात आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.भुसावळ विभागातील लघुसिंचन विभागाच्या अखत्यारीतील भुसावळ तालुक्यातील खंडाळा, मोंढाळा, वेल्हाळा तर बोदवड तालुक्यातील साळशिंगी व जुनोना तलावात यावर्षी पावसाळ्याचे प्रमाण अल्प राहिले. परिणामी तलावात पावसाअभावी पाणीसाठा झाला नाही. या तलावांच्या लाभ क्षेत्रातील तब्बल दीड हजार हेक्टरवर सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने शेतकºयांना रब्बीचा हंगाम घेणे अशक्य झाले आहे.भुसावळ विभागातील एकमेव वेल्हाळे तलावाल अल्पसा पाणीसाठा आहे. तो सिंचनाकरिता तोकडा पडणार असल्याने त्या लाभ क्षेत्रातील शेतकºयांना कृषी सिंचनाकरिता पाणी मिळणे अशक्य आहे. यामुळे शेतजमीन पेरणीअभावी पडून आहे. वेल्हाळे तलावाची उभारणीपासून मागील वर्षापर्यंत तलाव ऐन उन्हाळ्यातही ओसंडत होता. पाऊस अल्पसा झाला तरी दीपनगर औष्णिक केंद्राकडून वेल्हाळे येथील राखेच्या बंडात राखमिश्रीत पाणी सोडण्यात येत होते. तेच पाणी हळूहळू वाहत त्या पाण्याचा साठा तलावात होत होता. त्यामुळे हा तलाव नेहमी तुडूंब भरलेला रहायचा. परंतु प्रदूषण होत असल्याच्या कारणावरून अखेर औष्णिक वीज केंद्राकडून राखमिश्रीत पाण्याचे रिसायकलिंग करण्यात आल्याने तलावात पाणी येणे थांबले आहे. तलावात आज रोजी अल्पसा साठा उपलब्ध आहे. शेतकºयांना औष्णिक प्रकल्पामुळे वरदान ठरलेला तलाव प्रदूषणाच्या तक्रारीमुळे शेतकºयांच्या मूळावर आल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहे.याच तलावातून अवैधरित्या वीजपंप लावून चोरी केली जात आहे. पाण्याची चोरी रोखण्याकरिता समितीही बनविण्यात आली. परंतु कारवाई होत नसल्याने बिनधास्तपणे पाण्याची चोरी सुरूच आहे.अशी आहे भुसावळ विभागाच्या लघुसिंचन तलावांची स्थितीवेल्हाळे तलावाचे लाभक्षेत्र ३६४ हेक्टर आज रोजी २१ टक्के, मोंढाळा तलावाचे लाभ क्षेत्र २६४ हेक्टर, पाणी साठा शून्य टक्के, खंडाळा लाभ क्षेत्र २३२ हेक्टर पाणीसाठा शून्य टक्के, साळशिंगी लाभ क्षेत्र २६१ हेक्टर पाणीसाठा शून्य टक्के, जुनाना लाभ क्षेत्र ३१९ हेक्टर पाणीसाठा शून्य अशी तलावाची पावसाअभावी स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. 

 

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhusawalभुसावळ