६ सप्टेंबरपासून आयटीआयची पहिली प्रवेश फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:21 IST2021-08-19T04:21:21+5:302021-08-19T04:21:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : खासगी, शासकीय आयटीआय प्रवेशांचे वेळापत्रक नुकतेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले ...

६ सप्टेंबरपासून आयटीआयची पहिली प्रवेश फेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : खासगी, शासकीय आयटीआय प्रवेशांचे वेळापत्रक नुकतेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. ही प्रवेश प्रक्रिया शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने राबविण्यात येणार असून, ६ सप्टेंबरपासून पहिल्या प्रवेशाची फेरी प्रारंभ होणार आहे.
प्रत्येक शासकीय व खासगी आयटीआयमध्ये ५ जुलै ते २१ ऑगस्ट, २०२१ दरम्यान रोज सकाळी १० ते ११ या वेळेत नि:शुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. सुविधेचा सर्व उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे, तर सर्व सुट्टीच्या दिवशीही मार्गदर्शन सत्र व प्रवेश प्रक्रियेसंबंधी कार्यवाही सुरू राहणार आहे.
विद्यार्थ्यांना एकच अर्ज भरता येणार
विद्यार्थ्यांना एकच अर्ज भरता येणार आहे. एकापेक्षा अधिक अर्ज भरल्यास त्या विद्यार्थ्याचे सर्व अर्ज रद्द होतील, अशा विद्यार्थ्यांची निवड झाल्यास व चुकीने प्रवेश देण्यात आला असल्यास, त्याचा प्रवेश रद्द करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रवेश फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवडपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांनीही संपूर्ण कागदपत्र तपासणीसाठी सादर करावे. जर कागदपत्र सादर न करू शकलेल्या विद्यार्थ्याला बहाल करण्यात आलेली जागाही रद्द करण्यात येणार आहे.
असे आहे प्रवेशांचे वेळापत्रक
- ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे - १५ जुलै, २०२१ ते ३१ ऑगस्ट.
- पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे - १५ जुलै ते ३१ ऑगस्ट.
- प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे - २ सप्टेंबर.
- गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे व प्रवेश अर्जातील माहितीत बदल करणे - २ ते ३ सप्टेंबर.
- अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे - ४ सप्टेंबर.
- पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना कळविणे - ६ सप्टेंबर.
- पहिल्या फेरीनुसार प्रवेश निश्चिती करणे - प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे - ७ ते ११ सप्टेंबर.
- दुसरी प्रवेश फेरी - ७ ते १२ सप्टेंबर.
- दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे - १५ सप्टेंबर.
- दुसऱ्या यादीनुसार प्रवेश निश्चिती - १६ ते २० सप्टेंबर.
- तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे - १६ ते २१ सप्टेंबर.
- तिसरी गुणवत्ता यादी - २४ सप्टेंबर.
- तिसऱ्या यादीनुसार प्रवेश निश्चिती - २५ ते २८ सप्टेंबर.
- चौथी फेरी - २५ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर.
- चौथी गुणवत्ता यादी - ३ ऑक्टोबर.
- चौथ्या यादीनुसार प्रवेश निश्चिती - ४ ते ७ ऑक्टोबर.