मोठी बातमी! अपक्ष उमेदवाराच्या वाहनावर गोळीबार; मुक्ताईनगर विधानसभेतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 19:12 IST2024-11-05T19:12:17+5:302024-11-05T19:12:26+5:30
ही घटना राजूर ता.बोदवड येथे मंगळवारी दुपारी ३ वाजता घडली. सुदैवाने यात कुणालाही इजा झालेली नाही.

मोठी बातमी! अपक्ष उमेदवाराच्या वाहनावर गोळीबार; मुक्ताईनगर विधानसभेतील घटना
बोदवड (जि.जळगाव) : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या वाहनावर दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केला. ही घटना राजूर ता.बोदवड येथे मंगळवारी दुपारी ३ वाजता घडली. सुदैवाने यात कुणालाही इजा झालेली नाही.
अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे हे राजूर येथे प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या वाहनावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केला. यानंतर दुचाकीस्वार तिथून पसार झाले. पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत. पंचनाम्याचे काम सुरु आहे.