पाटणादेवी जंगलात आग, ३० ते ३५ हेक्टर क्षेत्र जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 13:21 IST2018-04-29T13:21:09+5:302018-04-29T13:21:09+5:30
शनिवारी रात्रीची घटना

पाटणादेवी जंगलात आग, ३० ते ३५ हेक्टर क्षेत्र जळून खाक
आॅनलाइन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. २९ - पाटणादेवी जंगल परिसरात शनिवारी आग लागली. धवलतीर्थ परिसरात आग पसरल्याने गवत जळून खाक झाले. रात्री उशिरापर्यंत ही आग धुमसत होती. कुणीतरी अज्ञाताने आग लावल्याचा संशय वनविभागाने व्यक्त केला आहे.
जंगल परिसरातील ३० ते ३५ हेक्टर परिसरात शनिवारी दुपारी गवताने अचानक पेट घेतला व आग पसरली. वनविभागाने टँकरने पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळवले. यात झाडांसह प्राण्यांचे फारसे नुकसान झाले नसून आग कशी लागली याचा शोध घेण्यात येईल, अशी माहिती वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम.बी. पटर्वधन यांनी दिली.