जामनेर तालुक्यातील मालदाभाडीच्या स्टॉर्च प्रकल्पाला आग

By Admin | Updated: April 12, 2017 17:01 IST2017-04-12T17:01:02+5:302017-04-12T17:01:02+5:30

जामनेर-बोदवड रस्त्यावरील मालदाभाडी स्टॉर्च प्रकल्पाला बुधवारी दुपारी वाढलेल्या तापमानामुळे अचानक आग लागली.

A fire in Maladbhadi's Storm Project in Jamner Taluk | जामनेर तालुक्यातील मालदाभाडीच्या स्टॉर्च प्रकल्पाला आग

जामनेर तालुक्यातील मालदाभाडीच्या स्टॉर्च प्रकल्पाला आग

 जामनेर,जि.जळगाव, दि.12 - जामनेर-बोदवड रस्त्यावरील मालदाभाडी स्टॉर्च प्रकल्पाला बुधवारी दुपारी वाढलेल्या तापमानामुळे अचानक आग लागली. या आगीत सुमारे तीन हजार क्विंटल पशुखाद्य खाक झाले आहे. 

जामनेर-बोदवड रस्त्यावर स्टॉर्च प्रकल्पात बुधवारी दुपारी अचानक आग लागली. यात तीन हजार क्विंटल पशुखाद्य, प्लॉस्टिकचे बॅरल, पाईक, केबल आदी साहित्य जळून खाक झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तत्काळ जामनेर नगरपालिकेचा बंब बोलविण्यात आला. तब्बल 1 तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आले. यात लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. (वार्ताहर)

Web Title: A fire in Maladbhadi's Storm Project in Jamner Taluk