जळगाव: शहरातील महेश नगर येथील चार मजली निकुंज अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर पहाटे ३:४५ वाजता भीषण आग लागली. यात भाडेकरू केशव वा़धवानी (५८) यांचा भाजून मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा लखन वाधवानी जखमी झाला आहे.
महेश नगर येथील निकुंज अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर केशव वाधवानी हे त्यांच्या चार सदस्य परिवारासोबत राहत होते. वाधवानी हे बेडरूम मध्ये झोपले होते. यानंतर काही क्षणातच आग लागली. केशव वाधवानी यांचा मृतदेह बाथरूममध्ये जळालेल्या अवस्थेत आढळून आला. मुलगा लखन वाधवानी हा आगीत गंभीररित्या भाजला झाला आहे. त्याला गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेत महिला व जतिन वाधवानी यांना मात्र ईजा झाली नाही. आग लागली, तेव्हा या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित होता. आग लागल्याचे सर्वप्रथम वाॕचमनच्या लक्षात आले. माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी नागरिकांच्या सहाय्याने फ्लॅटमधून इतर दोन दोघांना सुखरूप बाहेर काढले. तसेच जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलवले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.