वडजी येथे झोपडीला आग, संसार खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST2021-06-03T04:13:02+5:302021-06-03T04:13:02+5:30
वडजी येथे भिल्ल वस्तीतील रहिवासी मोहन भिल्ल यांच्या राहत्या झोपडीला अचानक आग लागली. त्यात झोपडी पूर्णपणे जळून खाक झाली. ...

वडजी येथे झोपडीला आग, संसार खाक
वडजी येथे भिल्ल वस्तीतील रहिवासी मोहन भिल्ल यांच्या राहत्या झोपडीला अचानक आग लागली. त्यात झोपडी पूर्णपणे जळून खाक झाली. यात सुमारे ७० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती तलाठी विलास शिंदे यांनी दिली. पती-पत्नी दोघंही मजुरीसाठी बाहेर कामाला गेले होते. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीचे कारण समजू शकले नाही. तलाठी विलास शिंदे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केल्याचे सांगण्यात आले.
यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या जिकिरीने ही आग आटोक्यात आणली. यावेळी वडजी ग्रामपंचायतीचे सदस्य समाधान पाटील, सुधाकर पाटील, स्वदेश पाटील यांनी भेटून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. सुधाकर पाटील यांनी तहसीलदार सागर ढवळे यांना यासंदर्भात माहिती देऊन तत्काळ मदत देण्यासंदर्भात विनंती केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मदत लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले, तर महसूल विभागाकडून या कुटुंबाला किराणा उपलब्ध करू देऊ, असे सांगितल्याची माहिती सुधाकर पाटील यांनी दिली.
समोर आग अन् डोळ्यात अश्रू
अन्नधान्यासह कपडे, टीव्ही, भांडी, आदी वस्तू जळाल्याने या कुटुंबाचा संसार अक्षरश: उघड्यावर आला आहे. जळालेला संसार पाहून सुनंदा भिल्ल यांच्या डोळ्यांत अश्रूंनी घर केले होते. समोर आगीत जळून गेलेला संसार आणि डोळ्यांत अश्रू असे हृदयस्पर्शी चित्र यावेळी बघायला मिळाले.
===Photopath===
020621\02jal_9_02062021_12.jpg
===Caption===
वडजी येथे आगीत जळून खाक झालेले झोपडीतील संसारोपयोगी साहित्य.