पाचोऱ्यातील जवानाचा छत्तीसगड येथे गोळी लागून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 18:09 IST2018-04-18T18:09:41+5:302018-04-18T18:09:41+5:30

सैन्य दलाच्या आयटीबीएफ दलात सेवारत जवान गणसिंग वनसिंग राजपूत (३०, रा. महिंदळे, हल्ली रा. विवेकानंदनगर, पाचोरा) यांचा चुकून गोळी सुटल्याने मंगळवारी सकाळी राजनंदन कॅम्प (छत्तीसगड) येथे मृत्यू ओढवला.

A fire in a fire in Chhattisgad is to be shot | पाचोऱ्यातील जवानाचा छत्तीसगड येथे गोळी लागून मृत्यू

पाचोऱ्यातील जवानाचा छत्तीसगड येथे गोळी लागून मृत्यू

ठळक मुद्देजवान गणसिंग राजपूत २००९ पासून सैन्यदलात नियुक्तदोन दिवसांपूर्वीच बेळगाव येथून राजनंदन कॅम्पला बदलीरायफलमधून गोळी सुटल्याने जागेवरच मृत्यू

आॅनलाईन लोकमत
पाचोरा, जि.जळगाव, दि.१८ : सैन्य दलाच्या आयटीबीएफ दलात सेवारत जवान गणसिंग वनसिंग राजपूत (३०, रा. महिंदळे, हल्ली रा. विवेकानंदनगर, पाचोरा) यांचा चुकून गोळी सुटल्याने मंगळवारी सकाळी राजनंदन कॅम्प (छत्तीसगड) येथे मृत्यू ओढवला.
ते या दलात २००९ पासून चालक म्हणून नियुक्त होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांची बेळगाव येथून राजनंदन कॅम्पला बदली झाली होती. राजपूत हे मंगळवारी कॅम्पमधील वाहनतळाठिकाणी शस्त्रासह बसलेले होते. त्या वेळी त्यांच्या रायफलमधून गोळी सुटून डोक्यात घुसल्याने जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.

Web Title: A fire in a fire in Chhattisgad is to be shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.