शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

औषध निर्मिती कंपनीत आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:42 AM

एमआयडीसीतील घटना : आगीत सव्वा कोटीचे नुकसान

जळगाव : एमआयडीसीतील बी सेक्टर २३ मध्ये असलेल्या स्मार्ट फार्मास्युटीकल या औषधीसाठी लागणारा कच्चा माल तयार करणाऱ्या कंपनीत उत्पादन विभागातील रिअ‍ॅक्टरला अचानक आग लागल्याची घटना २२ रोजी रात्री घडली. त्यात एक कोटी ३० लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेची मंगळवारी एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, नितीन रामदास गावंडे (४३, रा. लेक सिटी, मेहरुण, जळगाव) यांच्या मालकीची एमआयडीसीतील बी सेक्टरमध्ये स्मार्ट फार्मास्युटीकल नावाची औषधीसाठी लागणारा कच्चा माल तयार करणाऱ्या कंपनीत आहे. २२ रोजी रात्री उत्पादन विभागात नेवीव्हीलॉल हायड्रोक्लोराईड उत्पादनाचे काम सुरु असताना या मशीनवरील आॅपरेटर कैलास जगन्नाथ आमोदे यांनी अि‍ॅक्टरमधून १ किलो नेवीव्हीलॉल हायड्रोक्लोराईड काढले. त्याचवेळी रिअ‍ॅक्टरमध्ये अचानक आग लागली. त्यामुळे आमोदे तेथून तत्काळ बाजूला सरकले. कंपनीतील बाबू मिश्रा, भास्कर वाघ व इतर लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पाणी, वाळू व इतर कंपनीतील अग्निशमन यंत्रणेद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाचेही बंब मागविण्यात आले. सुदैवाने या आगीत कोणालाही दुखापत झाली नाही. व्यवस्थापक प्रशांत मगनराव सोनवणे यांनी या घटनेची माहिती मालक गावंडे यांना रात्रीच दिली. ते मुंबईला होते. दुसºया दिवशी जळगावात आल्यानंतर त्यांनी कंपनीत पाहणी केली व आगीत नेमके काय नुकसान झाले आहे याची माहिती घेतली. या आगीत ३ रिअ‍ॅक्टर, इलेक्ट्रिीक फिटींग, उत्पादन विभागाची इमारत व नेवीव्हीलॉल हायड्रोक्लोराईड या उत्पादनाच्या दोन बॅचेस अंदाजे ८३ किलो जळाले आहे. त्याची किमत १ कोटी ३० लाख रुपये इतकी आहे. मंगळवारी त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली.चटई कंपनीत शॉर्ट सर्कीटमुळे आगएमआयडीसीतील जी. २१ भागातील संजय प्लॅस्टिक कंपनीत वरच्या मजल्यावर कटिंग व शिलाई विभागात शिलाई मशिनच्या ईलेक्ट्रीक बोर्डात शॉर्ट सर्किट होवून चटईंना आग लागल्याची घटना २५ रोजी रात्री घडली. कंपनीतील विद्युत पुरवठा बंद करण्यात येवून फायर सिलेंडर व पाण्याचे सहाय्याने आग विझविण्यात आली. या घटनेत सुमारे ४० हजार रुपये किंमतीची चटई कटींग मशिन तसेच सुमारे ५०० किलो वजनाचे तयार चटईचे गठ्ठे त्यांची किंमत सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक श्रेयांश संजय भुत्रा यांच्या खबरीवरुन अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :fireआग