जीएमसीला अखेर दोन स्ट्रेचर भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:21 IST2021-02-27T04:21:53+5:302021-02-27T04:21:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आपात्कालीन विभागात स्ट्रेचरची संख्या कमी असल्याने, अचानक मोठा अपघात झाल्यानंतर रुग्णांना रुग्णालयात नातेवाइकांनाच उचलून ...

जीएमसीला अखेर दोन स्ट्रेचर भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आपात्कालीन विभागात स्ट्रेचरची संख्या कमी असल्याने, अचानक मोठा अपघात झाल्यानंतर रुग्णांना रुग्णालयात नातेवाइकांनाच उचलून आणावे लागत असल्याचे गंभीर चित्र होते. मात्र, मराठे परिवारातर्फे रुग्णालयाला दोन स्ट्रेचर भेट देण्यात आल्याने, ही धावपळ आता वाचणार आहे. गुरुवारी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
द्वारकाबाई गोवर्धन मराठे (मते) यांच्या तिसऱ्या स्मरणार्थ मराठे परिवाराने रुग्णसेवेच्या हेतूने दोन स्ट्रेचर भेट दिले. या स्ट्रेचरच्या लोकार्पणप्रसंगी उपअधिष्ठाता डॉ.मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.वैभव सोनार, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ.इम्रान पठाण, सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे डॉ.किशोर इंगोले, डॉ.नितीन विसपुते, अधिसेविका कविता नेतकर, आपत्कालीन विभागप्रमुख सुरेखा लष्करे, बापू बागलाणे, अशोक मराठे, बाळासाहेब मराठे, शालीग्राम मराठे, विष्णू बाळदे, जगदीश वाघ, जगन्नाथ पाटील, संजय अहिरे आदी उपस्थित होते.
फोटो २७ सीटीआर ३३