...अखेर स्टेशन रोडची मुरूम टाकत दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:22 IST2021-09-10T04:22:30+5:302021-09-10T04:22:30+5:30
भुसावळ : जंक्शन शहर ओळख असलेल्या शहरांमध्ये रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी प्रचंड नरकयातना सोसाव्या लागत होत्या. गेल्या पंधरा ते ...

...अखेर स्टेशन रोडची मुरूम टाकत दुरुस्ती
भुसावळ : जंक्शन शहर ओळख असलेल्या शहरांमध्ये रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी प्रचंड नरकयातना सोसाव्या लागत होत्या. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून हा रस्ता आहे? की शेत रस्ता हे समजायला मार्ग नव्हता. फूटभर खोल रस्त्यावर अखेर उपनगराध्यक्षा सोनी संतोष बारसे व माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्या पुढाकाराने सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुरूम टाकण्यास सुरुवात झालेली आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या १५ ते २० वर्षांपासून हा रस्ता नरकयातना सोसत आहे. रेल्वे प्रशासनाने संपूर्ण रेल्वे परिसरात अंतर्गत रस्ते चकचकीत केलेले आहे. मात्र, अवघ्या ५०० मीटरचा हा रस्ता करण्यासाठी फंड नसल्याचे कारण पुढे करण्यात येत होते. भुसावळच्या रस्त्यावरून नुकतेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित प्रशासनाला खडे बोल सुनावले होते.
अखेर कामाला सुरुवात
गुरुवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तर थेट अमर स्टोअर्स मार्गे हनुमान मंदिरापर्यंत मुरुमाद्वारे खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
रिक्षाचालक व व्यापाऱ्यांनी केले स्वागत
एखाद्या खेडेगावात तरी रस्त्याची परिस्थिती समाधानकारक असते. त्यापेक्षाही विदारक स्थितीत रिक्षाचालकांना खोल खड्ड्यात, साचलेल्या पाण्यामध्ये रिक्षा उभ्या कराव्या लागत होत्या. या रस्त्यावरून ज्या व्यापारी यदीब नागरिकांना ये-जा करावी लागत होती, ते देखील हैराण झाले होते; मात्र काम सुरू झाल्याने त्यांनी संतोष बारसे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
पावसाळ्यानंतर होणार डांबरीकरण
खड्डेमय रस्त्यांना तूर्त मुरुमाचा
दिलासा मिळाला असून या रस्त्याच्या डांबरीकरणाला पावसाळ्यानंतर सुरुवात होणार आहे. याचे काम जामनेर येथील दर्शन कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आल्याचे आल्याची माहिती माजी नगरसेवक संतोष बारसे यांनी दिली.