अखेर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९७ टक्के पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:00 IST2021-02-05T06:00:48+5:302021-02-05T06:00:48+5:30
जळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून ९६ टक्क्यांपर्यंत अडकून असलेले कोरानातून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण अखेर शुक्रवारी वाढून ९७ ...

अखेर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९७ टक्के पार
जळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून ९६ टक्क्यांपर्यंत अडकून असलेले कोरानातून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण अखेर शुक्रवारी वाढून ९७ टक्क्यांच्या पार गेले. शुक्रवारी जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९७. १ टक्के नोंदविण्यात आला आहे.
जिल्ह्यात ३५ नवे रुग्ण आढळून आले असून ४० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ५६,९७६ झाली असून यातून ५५,२७० रुग्ण बरे झाले आहेत.
शिक्षकांच्या तपासण्यांमुळे प्रलंबित अहवाल वाढले
शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या कोरोना तपासण्या बंधनकारक असल्याने शिक्षकांच्या आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या असून त्यांचे नियमितचे अहवाल हे प्रयोगशाळेच्या क्षमतेपेक्षा अधिक असल्याने प्रलंबित अहवालांची संख्या ही २,९०८ वर पोहोचली आहे. शुक्रवारी १,०१० आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या तर ३५ जण बाधित आढळून आले आहेत.