शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

अखेर पाचव्या दिवशी उघडले दहीवद शाळेचे कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 9:57 PM

संस्थेच्या सचिवांची मध्यस्थी : गावकऱ्यांचेही एक पाऊल मागे

चाळीसगाव, जि.जळगाव : शालेय पोषण आहाराच्या ठेक्यावरुन स्थानिक संचालक आणि मुख्याध्यापक यांच्यात झालेल्या वादाचे पर्यावसन दहीवद शाळेला कुलूप लावण्यात झाले. अखेरीस पाचव्या दिवशी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अरुण निकम यांनी मध्यस्थी करुन शुक्रवारी दुपारी एक वाजता शाळेचे कुलूप उघडले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ग्रामस्थांनीही एक पाऊल मागे घेतले.दहीवद शाळेत शालेय पोषण आहाराच्या ठेक्यावरुन मुख्याध्यापक ईश्वर सीताराम अहिरे आणि स्थानिक संचालक यांच्यात वाद झाल्याने मुख्याध्यापक अहिरे यांची बदली केली होती.कर्तव्यदक्ष मुख्याध्यापकाची बदली झाल्याने ग्रामस्थांचा संताप झाला. ७ रोजी ग्रामस्थांनी एकत्र येऊन थेट शाळेला कुलूप ठोकले. गेल्या पाच दिवसांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.शुक्रवारी अरुण निकम, उपाध्यक्ष डॉ. संजय देशमुख, बाळासाहेब चव्हाण, धनंजय चव्हाण, आनंदराव पवार अशोक पाटील, अशोक खलाणे, सरपंच सुरेखा पवार, माजी भीमराव पवार, उपसरपंच भीमराव खलाणे, धर्मा वाघ, हिंमत निकम, गोरख पवार, नवल पवार, मुख्याध्यापक ईश्वर अहिरे आदींच्या उपस्थित शाळेचे कुलूप उघडले गेले.

टॅग्स :SchoolशाळाChalisgaonचाळीसगाव