दरम्यान, पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक तथा तपासाधिकारी संदीप पाटील यांनी कळमकर याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता पुन्हा त्याच्या कोठडीत वाढ झाली आहे. न्यायालयाने त्याला १५ सप्टेबरपर्यंत कोठडी सुनावली. तपासाधिकाऱ्यांनीच स्वत: युक्तिवाद करून कोठडीची कारणे सांगितली. तिसऱ्यांदा त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे.
पुन्हा कळमकर याला सोबत घेऊन नाशिक व पारनेर गाठले. यावेळच्या झडतीत पारनेर येथील त्याचे मुख्य कार्यालय पोलिसांनी शोधून काढले. हे आलिशान कार्यालय आहे. त्यात अष्टविनायक डेव्हलपर्स याच्याशी पाच गुंठे जागा विकसित करण्याचा करार आढळून आला. या करारात आपले दहा फ्लॅट असल्याचे त्यात नमूद आहे. दरम्यान, याच कार्यालयात पाणलोट विकास कार्यक्रमासाठी ५२ जणांच्या नावाने नियुक्ती आदेश व शासकीय ओळखपत्रदेखील मिळून आलेले आहेत. त्याशिवाय दोन वेगवेगळ्या क्रमांकाचे पॅनकार्डही यात सापडले आहेत. पाणलोट योजनेशी संबंधित ग्रामपंचायतींचे प्रस्ताव व आशुतोष संजय शिंदे याची पारनेर येथे कृषीतज्ज्ञ तर धनंजय रामचंद्र पांडे यांची कनिष्ठ लिपिक म्हणून नियुक्ती दिल्याचे नियुक्तीपत्र मिळून आलेले आहेत, पण त्यावर सही नाही. त्यामुळे हे सारेच प्रकार संशयास्पद आहेत.
कोट...
आतापर्यंतच्या तपासात अनेक महत्त्वाची कागदपत्रे हाती लागलेली आहेत. प्रत्येक वेळी नवनवीन माहिती समोर येत असल्याने या गुन्ह्याची व्याप्ती आणखीन वाढत चालली आहे. तपास योग्य दिशेने सुरू आहे. याच प्रकरणाशी कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क करण्याचे आवाहन आम्ही केले आहे.
- संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक