अखेर एरंडोलमध्ये कोरोनाचा शिरकावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 21:25 IST2020-05-21T21:21:41+5:302020-05-21T21:25:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क एरंडोल:-जवळपास दोन ते अडीच महिन्यापासून कोरोना मुक्त असलेले एरंडोल शहर व तालुका अखेर आज गुरुवारी २१ मे रोजी 45 वर्षीय एक पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

अखेर एरंडोलमध्ये कोरोनाचा शिरकावा
लोकमत न्यूज नेटवर्क
एरंडोल:-जवळपास दोन ते अडीच महिन्यापासून कोरोना मुक्त असलेले एरंडोल शहर व तालुका अखेर आज गुरुवारी २१ मे रोजी 45 वर्षीय एक पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून चिंतेचे वातावरण पसरले आहे.
गेल्या तीन दिवसापासून एरंडोल येथील एक व्यक्ती जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल होता. सदर इसम येथे महात्मा फुले पुतळा परिसरात वास्तव्यास आहे. दरम्यान, पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णाच्या घराच्या परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे