तांबापुरा भागात दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 12:52 IST2020-06-01T12:52:01+5:302020-06-01T12:52:26+5:30

परस्पर विरोधी तक्रारी

Fighting in two groups in Tambapura area | तांबापुरा भागात दोन गटात हाणामारी

तांबापुरा भागात दोन गटात हाणामारी

जळगाव : तांबापुरा परिसरातील बिलाल चौकात वेगवेगळ्या कारणावरुन दोन गटात शनिवारी रात्री दहा वाजता हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधात एमआयडीसी पोलिसात दहा जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रात्री घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, उपनिरीक्षक संदीप पाटील, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, विजय नेरकर, नितीन पाटील, अशोक संगत व सचिन पाटील यांनी तातडीने घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
नईम उर्फ कल्लु खलील खाटीक (३७) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसात दाखल केलेली केस मागे न घेतल्याच्या रागातून जुनेद शेख युनुस, रफिक शेख अमीर नेपाली, अमीर नेपाली, साबेराबी शेख अमिर (जुनेदची आई), इशरद बी(जुनेदची बहिण), साजेदाबी (जुनेदची मावशी) सर्व रा. बिलाल चौक यांनी नईमला मारहाण केली. दुसऱ्या गटातील फिर्यादीनुसार, शेख जुनेद शेख युनुस (२१) हा पॅरोल सुट्टीवर घरी आला होता. संशयित आरोपी शेखु जुनेद हा पॅरोल वर कसा सुटला यांचा राग आल्याने कल्लु खाटील, फिरोज खाटीक, शाहरुख खाटीक, सलीम खाटील यांनी शेख जुनेद याला बेदम मारहाण केली तर कल्लु खाटीकने पाईप मारून दुखापत केली.

Web Title: Fighting in two groups in Tambapura area

टॅग्स :Jalgaonजळगाव