पतीसह कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यूनंतरही शोभाबाईची जीवनासोबत लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 10:41 PM2018-10-17T22:41:30+5:302018-10-17T22:44:06+5:30

पतीसह दोन्ही दिरांच्या अकाली निधनानंतर आलेल्या संकटांनी खचून न जात धैर्याने परिवाराची धुरा सांभाळणारी वाकोदची नवदुर्गा शोभाबाई भिल या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

Fighting with Shobha Bai's life after the death of five family members including husband | पतीसह कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यूनंतरही शोभाबाईची जीवनासोबत लढाई

पतीसह कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यूनंतरही शोभाबाईची जीवनासोबत लढाई

Next
ठळक मुद्देशोभाबाईने सांभाळली संकटसमयी परिवाराची धुराशोभाबाई भिल यांचा आयुष्याचा खडतर प्रवास देतोय इतरांना प्रेरणावर्षभरात झाले पाच जणांचे निधन

अर्पण लोढा

वाकोद, ता. जामनेर : पतीसह दोन्ही दिरांच्या अकाली निधनानंतर आलेल्या संकटांनी खचून न जात धैर्याने परिवाराची धुरा सांभाळणारी वाकोदची नवदुर्गा शोभाबाई भिल या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
वाकोदच्या शोभाबाई यांची संघर्षमय कहानी पती जगन भिल (५२), दिर संतोष (३५) आणि हिरामण (३०) या तिन्ही भावंड एकत्र एकोप्याने राहत असतांना अचानक यांच्या संसाराला नजर लागली. दिर हिरामणचे आजारी पडून काही दिवसातच निधन झाले. त्याचे दु:ख सरत नाही तोच संतोष याचादेखील मृत्यू झाला. दोन तरुण भावाच्या मृत्यू शोभाबाई यांचे पती जगन यांना वेदनादायी ठरला. तोच वर्षभराच्या आत जगन भिल यांच्या दोन बहिणी देवकाबाई आणि कुसुमबाई यांचा देखील अचानक पणे मृत्यू झाला. वर्षभरात दोन भाऊ, दोन बहिणी आपल्यातून निघून गेल्याने जगन भिल यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यानंतर जगन यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या सकंटकाळात त्यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. तीन मुलींचे लग्न झाले असून एक मुलगी शिक्षण घेत आहे. दोन दीर, दोन नणंद व घरातील कर्ता पुरुष गेल्याचा आघात असताना शोभाबाई घरातील कुटुंबीयांना मोठा धीर देत सर्वच जबाबदारी समर्थपणे सांभाळली.

Web Title: Fighting with Shobha Bai's life after the death of five family members including husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.