अंतिम श्वासापर्यंत लढणार- आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:13 IST2021-07-02T04:13:13+5:302021-07-02T04:13:13+5:30
भुसावळ : अंतिम श्वासापर्यंत लढणार असल्याचा निर्धार आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ३० वर्षे जुना इस्मा कायदा ...

अंतिम श्वासापर्यंत लढणार- आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांचा निर्धार
भुसावळ : अंतिम श्वासापर्यंत लढणार असल्याचा निर्धार आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
३० वर्षे जुना इस्मा कायदा भारत सरकारने संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी अंमलात आणला. संरक्षण कर्मचारी निगमीकरणचे विरोधात २६ जुलैपासून अनिश्चित काळासाठी संपावर जाणार आहेत. तो संप तोडण्यासाठी आज सरकारद्वारे ‘एस्मा’ कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला. याचा संरक्षण क्षेत्रात कार्यरत एआयडीईएफ आयएनडीडब्ल्यूएफ, बीपीएमएस, सिडरा, एआयडीबीडीएफ सह सर्व कामगार महासंघानी एकत्र येऊन घोषित काळा कायद्याचा निषेध व्यक्त केला.
संपावर समाधान किंवा कुठल्या पद्धतीचा तोडगा निघू शकेल की नाही याचा विचार न करता कायद्याच्या रुपात कर्मचाऱ्यांवर घाव घालण्याचा निर्णय आहे. निगमीकरण रद्द करण्यासाठी संरक्षणमधील तिन्ही फेडरेशनसमवेत अन्य फेडरेशनानी संयुक्तरीत्या संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून शेवटच्या क्षणापर्यंत निगमीकरण निर्णाविरोधात लढाई सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आयुध निर्माणीचे निगमीकरण निर्णय रद्द करण्यासाठी देशातील ४१ आयुध कारखान्यांचे ७६ हजार कर्मचारी २६ जुलैपासून अनिश्चितकालीन संपावर जाणार आहेत. दि. ८ जुलै रोजी सर्व कर्मचारी संपाबाबत नोटीस सरकारला बजावणार आहे. यापूर्वी सरकारद्वारा आयुध निर्माणींचा घेतला गेलेला निगमिकरणचा निर्णय रद्द करण्याची मागणी संरक्षणमध्ये कार्यरत तिन्ही फेडरेशनने संयुक्तरीत्या केलेली आहे. सर्व कर्मचारी ८ जुलै रोजी संपाची नोटीस सरकारला बजावतील, अशी माहिती अखिल भारतीय संरक्षण महासंघाचे उपाध्यक्ष राजेंद्र झा यांनी दिली.