रस्त्यांचा प्रश्नावर सत्ताधाऱ्यांविरोधात रान पेटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:32 AM2021-09-02T04:32:59+5:302021-09-02T04:32:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेत सत्तांतर होऊन आता सहा महिने पूर्ण झाले आहेत. नागरिक शहरातील खराब रस्त्यांच्या ...

Fight against the authorities on the question of roads | रस्त्यांचा प्रश्नावर सत्ताधाऱ्यांविरोधात रान पेटवा

रस्त्यांचा प्रश्नावर सत्ताधाऱ्यांविरोधात रान पेटवा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेत सत्तांतर होऊन आता सहा महिने पूर्ण झाले आहेत. नागरिक शहरातील खराब रस्त्यांच्या समस्यांमुळे त्रस्त झाले असून, आता मरगळ झटकून रस्त्यांच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांविरोधात रान पेटवा अशा सूचना भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी भाजप नगरसेवकांना दिल्या आहेत. आता सत्ताधाऱ्यांना देण्यात आलेली सहा महिन्यांची संधी संपली असून, विरोधी पक्षाची ताकद दाखवून द्या, अशा शब्दात महानगराध्यक्षांनी भाजप नगरसेवकांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजप नगरसेवकांची बैठक सोमवारी रात्री भाजप कार्यालयात पार पडली. या बैठकीला भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा शहर सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, दीपक साखरे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, विशाल त्रिपाठी, नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे, धीरज सोनवणे, ॲड. शुचिता हाडा, दीपमाला काळे, डॉ.चंद्रशेखर पाटील यांच्यासह भाजपचे इतर नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर गेल्या महिन्यात भाजपचे अस्तित्वच शहरात दिसून येत नाही. नागरिक खराब रस्त्यांनी, कचऱ्याच्या समस्यांनी त्रस्त आहेत. मात्र, या समस्या प्रशासनासमोर मांडण्यात भाजप कमी पडत असून, आता शहरातील नागरिकांच्या समस्यांबाबत कोणतीही तडजोड न करता थेट सत्ताधारी व मनपा प्रशासनाविरोधात आक्रमक पद्धतीने प्रश्न मांडा, अशा सूचनाही पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत नगरसेवकांना दिल्या आहेत.

मरगळ झटका आणि कामाला लागा

अनेक नगरसेवकांनी या बैठकीत प्रभागात कामे होत नसल्याचे सांगितले. तसेच मनपा प्रशासनातील अधिकारीदेखील दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्याविरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. पक्षाने आता मरगळ झटकून आपले अस्तित्व दाखवून द्यावे, असेही मत काही नगरसेवकांनी या बैठकीत मांडले. घनकचरा, अमृतची कामे, मनपातील गलथान कारभार असो वा शहरातील रस्ते अशा सर्वच प्रश्नांवर आंदोलने करून, प्रशासन व सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे.

Web Title: Fight against the authorities on the question of roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.