Fifth accused arrested in Altamesh Rashid murder case | अल्तमेश रशीद खूनप्रकरणी पाचव्या आरोपीसही अटक

अल्तमेश रशीद खूनप्रकरणी पाचव्या आरोपीसही अटक

भुसावळ : शहराला लागून असलेल्या खडका चौफुलीजवळील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखाली अल्तमेश शेख रशीद (वय १९) या तरुणावर चाकूने सपासप वार करून त्याचा खून केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीसही पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत याआधी बाजारपेठ पोलिसात १४ रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात फरार आरोपी क्रमांक पाच आदर्श उर्फ आदू मनोहर गायकवाड (वय १९) याची उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून १६ रोजी पहाटे पाच वाजता पंधरा बंगला भागातून ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप भागवत याच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. अनिल मोरे, मंगेश गोटला, पो.ना. रवींद्र बिºहाडे, किशोर महाजन, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, समाधान पाटील, पो.कां. विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, योगेश महाजन, कृष्णा देशमुख आदींनी केली आहे.

Web Title: Fifth accused arrested in Altamesh Rashid murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.