भुसावळातील तरुणावर प्रतापगड येथे गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 18:48 IST2017-08-28T18:46:26+5:302017-08-28T18:48:14+5:30

पोलिसांनी घेतले दोन संशयितांना ताब्यात

A fierce youth fired at Pratapgad | भुसावळातील तरुणावर प्रतापगड येथे गोळीबार

भुसावळातील तरुणावर प्रतापगड येथे गोळीबार

ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.28 - रिंगरोडला लागून असलेल्या चाहेल ढाब्याजवळील  प्रतापगड ढाब्याचे मालक बबलू याच्यावर उत्तरप्रदेश राज्यातील प्रतापगड येथे भुसावळातील युवकांनी गोळीबार केला. यात बबलू जखमी झाला. त्याच्यावर अलाहाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजता घडली. दरम्यान, रविवारी रात्री येथील प्रतापगड ढाब्यावर काहींनी हल्ला करुन तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी दोन संशयीतांना अटक करण्यात आली.
 प्रतापगड धाबा दोन भाऊ चालवीत आहेत. त्यातील बबलू हा गावी गेला असता त्याच्यावर उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे आपल्या घरी गेला असता दुपारी तीन वाजता त्याच्यावर बंदुकीने गोळ्या झाडून जिवे ठार मारण्याचा प्रय} झाला. दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली. 

Web Title: A fierce youth fired at Pratapgad