अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या स्त्री अर्भकाचा खून

By Admin | Updated: June 26, 2017 13:36 IST2017-06-26T11:13:45+5:302017-06-26T13:36:26+5:30

किनगाव येथील मातेसह आई-वडील व भावाविरुद्ध गुन्हा

Female infanticide blood born of immorality | अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या स्त्री अर्भकाचा खून

अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या स्त्री अर्भकाचा खून

 ऑनलाईन लोकमत 

यावल,दि.26- अनैतिक संबधातून 20 वर्षीय तरुणीने स्त्री अर्भकास जन्म दिल्यानंतर समाजात बदनामी होईल या भीतीने मातेसह आई-वडील व भावानेच गळा आवळून खून केल्याची घटना तालुक्यातील किनगाव येथे 16 ते 17 जूनदरम्यान घडली़ या प्रकरणी चौघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला़ 
दरम्यान, या घटनेचे बिंग फुटल्यानंतर रविवारी रात्री यावल पोलीस ठाण्यात  बाळाच्या हत्येसह पुरावा नष्ट करण्याच्या कलमान्वये मातेसह चार जणांविरुध्द येथील पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. पुरलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदनासाठी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कुंदन हिरे यांच्या समक्ष अर्भकाचे शव बाहेर काढण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी सांगितल़े  तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे, सहा़फौजदार रवींद्र साळी करीत आहेत़

Web Title: Female infanticide blood born of immorality