जळगावात आदिवासी समाजातील गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 18:42 IST2018-08-05T18:35:14+5:302018-08-05T18:42:58+5:30
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी चेतना परिषदेतर्फे आदिवासी समाजातील दीडशे गुणवंत विद्यार्थ्यांचा रविवारी सकाळी ११ वाजता स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़

जळगावात आदिवासी समाजातील गुणवंतांचा सत्कार
जळगाव- जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी चेतना परिषदेतर्फे आदिवासी समाजातील दीडशे गुणवंत विद्यार्थ्यांचा रविवारी सकाळी ११ वाजता स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ हा गुणगौरव सोहळा शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयात पार पडला़
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉ़श्रीधर साळुंखे होते़ तर व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषद शिक्षण सभापती पोपट भोळे, जि़प़ सभापती प्रभाकर सोनवणे, उपमहापौर गणेश सोनवणे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, यावल प्रकल्प अधिकारी आऱबी़हिवाळे, बी़बी़जोमे, डी़पी़साळुंखे, प्रज्ञा सोनवणे, रूपाली वाघ, दिलीप सुर्यवंशी, आदिवासी एकता परिषदेचे सुनील गायकवाड, सिताराम पारधी, जितेंद्र सपकाळे, प्रदीप सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते़ प्रास्ताविक अजय कोळी यांनी केले़ सूत्रसंचालन शैलेश शिरसाठी यांनी केले तर राजु सोनवणे यांनी आभार मानले़
विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या दहावी, बारावी तसेच पदवीधर, पदवीका डिप्लोमा, एमबीबीएस, बीएचएमएस तसेच क्रीडा व इतर क्षेत्रात विशेष कामगिरी बजावलेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला़ दरम्यान, सत्कारार्थींमध्ये मिनी गोल्फ या खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू किर्ती बाविस्कर, नेट-सेट उत्तीर्ण प्रा़ तेजस तायडे, बीएएमएस ची विद्यार्थीनी देवयानी तायडे, एमबीबीएस उत्तीर्ण सुप्रिया गोकुळ सोनवणे या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार झाला़ कार्यक्रमात तडवी भिल्ल एकता मंच, आदिवसी एकता परिषद, आदिवासी पारधी महासंघ, ठाकुर जमात सेवा मंडळ या संस्थांनी देखील कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता़