जळगावात जुन्या लाकडी इमारतीला भिषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2017 17:23 IST2017-05-22T17:23:57+5:302017-05-22T17:23:57+5:30
जयकिसनवाडीतील एका जुन्या लाकडी इमारतीला सोमवारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास भिषण आग लागली़
जळगावात जुन्या लाकडी इमारतीला भिषण आग
जळगाव : शहरातील जयकिसनवाडीतील एका जुन्या लाकडी इमारतीला सोमवारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास भिषण आग लागली़ नवजीवन मंगल कार्यालयासमोरील बाजूने इमारतीच्या खाली दुचाकी गॅरेजचे गोडाऊन तसेच वरच्या मजल्यावरील घर आगीत पूर्णत: खाक झाल़े
प्रल्हाद अरुण कस्तुरे यांनी जयकिसनवाडीत भाडय़ाने खोली घेतली असून त्यात गॅरेजचा जुन्या दुचाकीचे स्पेअरपार्ट, ऑईल फिल्टर असे सामान होते. या गोडाऊनला सुरुवातीला आग लागली़ ऑईल फिल्टरमुळे आगीने भडका घेतला़ वरचा व खालचा असे दोन्ही मजले आगीत खाक झाले.
आगीची मिळताच महानगरपालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल़े इमारतीच्या मागील बाजूने तसेच समोरील बाजूने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होत़े दीड तासात घटनास्थळावर दहा बंब खाली झाले होत़े गोडाऊनमधील ऑईल फिल्टरने पेट घेतल्याने पाण्याने आग नियंत्रणात येत नसल्याने अखेर जैन इरिगेशन कंपनीतील बंब मागविण्यात आला.