नातू झाला तरी सासरी छळ सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:12 IST2021-06-11T04:12:11+5:302021-06-11T04:12:11+5:30

स्टार ७९९ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत चाललेली आहे. बलात्कार, विनयभंग आत्महत्येस प्रवृत्त ...

Father-in-law persecuted even after having a grandson | नातू झाला तरी सासरी छळ सुरुच

नातू झाला तरी सासरी छळ सुरुच

स्टार ७९९

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत चाललेली आहे. बलात्कार, विनयभंग आत्महत्येस प्रवृत्त करणे यासारख्या घटनांपेक्षा कुटुंबात छळाच्या घटना अधिक आहेत. जळगाव जिल्ह्यात दीड वर्षात पती-पत्नी यांच्यातील वादाच्या १५९३ घटना घडलेल्या आहेत. त्यात भादंवि कलम ४९८ चे २१२ गुन्हे दाखल झालेले आहेत तर ११४ प्रकरणांमध्ये तडजोड घडवून आणण्यात आली आहे. १३० प्रकरणांमध्ये पती-पत्नी न्यायासाठी न्यायालयात गेले आहेत.

नॅशनल क्राईम रिपोर्ट नुसार विवाहानंतर महिलांवर हिंसाचार केल्याच्या तक्रारीचे राष्ट्रीय प्रमाण २८.९ इतके आहे. महाराष्ट्राचे प्रमाण २१.४ टक्के आहे.जळगाव जिल्ह्यात अंदाजे दोन टक्के हे प्रमाण आहे. खासकरून शहरी व सुशिक्षित लोकांमध्येच हे प्रमाण अधिक आहे. पती किंवा पत्नीचे बाहेर इतर लोकांशी असलेली जवळीक, मालमत्ता नावावर करणे, तुम्ही माझे लाड केलेच नाहीत, दागिने घेऊन दिले नाहीत. बाहेर फिरायला घेऊन जात गेले नाहीत. तारुण्यात देखील बाहेर कुठे घेऊन गेले नाहीत, आता नातू पणतूचे झालो. वेळ आहे तरीदेखील दुर्लक्ष करतात, दुसऱ्यांना मात्र वेळ देतात अशी कारणे पत्नीकडून सांगण्यात आलेली आहेत.

२०२० मध्ये जिल्ह्यात कलम ४९८ अंतर्गत दाखल गुन्हे : ९७

समझोते झालेले प्रकरणे : ५९

न्यायालयात गेलेले : ६०

२०२१ मध्ये जिल्ह्यात कलम ४९८ अंतर्गत दाखल गुन्हे : ११५

समझोते झालेले प्रकरणे : ५४

न्यायालयात गेलेले : ७०

बाॅक्स

पन्नाशी ओलांडली तरी छळ सुरुच

कौटुंबिक छळाच्या घटना या केवळ तरुण दाम्पत्यांमध्येच आहेत,असे नाही तर वयाची पन्नाशी ओलांडलेल्या दाम्पत्यात देखील आहेत. दोन दिवसापूर्वीच ७० वय असलेले वृद्ध महिला सहाय्य कक्षात आले होते. पत्नी व मुलांकडून आपला छळ होत असल्याची तक्रार त्यांनी दिली. यात पत्नीचे वय ६२ वर्ष आहे.

प्रतिक्रिया...

रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका दाम्पत्यात मालमत्ता व सोने चांदीचे दागिने घेण्यावरून वाद सुरू आहे. या प्रकरणावर नाशिकमध्ये तडजोड केली जात आहे. त्याशिवाय पती आपल्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतो या कारणावरून पती-पत्नीत वाद सुरु आहेत. यापूर्वी वर्षभरात सात ते आठ प्रकरणांमध्ये तडजोड घडवून आणली.

- मंगला बारी, सामाजिक कार्यकर्त्या

प्रतिक्रिया...

गेल्या पाच वर्षात ५० व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या दाम्पत्यांमधील वादाचे १४ प्रकरणे हाताळली. त्यात सहा ते सात प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड झाली. बहुतांश‌ प्रकरणात पती किंवा पत्नी यांचे बाहेर त्रयस्त व्यक्तीशी असलेली जवळीक व आर्थिक ही कारणे समोर आली आहे.

- निवेदिता ताठे, सामाजिक कार्यकर्त्या

Web Title: Father-in-law persecuted even after having a grandson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.